विशेष

पंढरी कार्तिकी यात्रेत मंदिर समितीस 4.77 कोटीचे दान

गतवर्षी पेक्षा 1.56 कोटीची वाढ

पंढरपूर तालुका प्रतिनिधी

सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांची माहिती.* पंढरपूर (ता.01) :- कार्तिकी यात्रा दरवर्षी कार्तिक शुध्द एकादशी या दिवशी भरते. सन 2023 यावर्षी कार्तिकी यात्रा गुरूवार, दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 रोजी होती. या दिवशी मा.उपमुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस व सौ.अमृता फडणवीस तसेच मानाचे वारकरी श्री.बबन विठोबा घुगे व सौ.वत्सला बबन घुगे यांच्या शुभहस्ते श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. या यात्रेचा कालावधी दि.14/11/2023 ते दि.27/11/2023 असा होता.या यात्रेत मंदिर समितीस विविध माध्यमांतून रू.4,77,08,268/- इतकी देणगी प्राप्त झाली आहे. त्यामध्ये श्रींच्या चरणावर रू.40,15,667/-, देणगी स्वरूपात रू.1,30,05,486/-, लाडूप्रसादातून रू.62,49,000/-, भक्तनिवासातून रू.66,62,377/-, सोने-चांदी भेट वस्तूमधून रू.8,36,254/-, परिवार देवता व हुंडीपेटीतून रू.1,57,21,527/-, मोबाईल लॉकर व इतर जमेमधून रू.10,94,807/- इत्यादीचा समावेश आहे. गतवर्षीच्या कार्तिकी यात्रेपेक्षा रू.1,56,48,526/- इतकी उत्पन्नात वाढ झाली आहे. याशिवाय, सुमारे 3 लाख 40 हजार 478 एवढ्या भाविकांनी श्रींचे पदस्पर्श दर्शन व 5 लाख 71 हजार 220 एवढ्या भाविकांनी श्रींचे मुखदर्शन घेतले असल्याची माहिती सह अध्यक्ष श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी श्री.राजेंद्र शेळके यांनी दिली

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!