आरोग्य

जनकल्याण हॉस्पीटल च्य्या वतीने ,देवडे ता.पंढरपुर येथे 114 रुग्णांची मोफत आरोग्य शिबीर संपन्न

पंढरपूर तालुका प्रतिनिधी

ग्रामपंचायत देवडे व जनकल्याण हॉस्पिटल यांच्या वतीने गावामध्ये 114 रुग्णांची मोफत तपासणी करून उपचार करण्यात आले. प्रास्तविक भाषणामध्ये हॉस्पीटल चे व्यवस्थापक श्री सद्दाम मनेरी यांनी ,स्व वसंतदादा काळे यांच्या विचाराने प्रेरित व सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री कल्याणराव काळे यांचे मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या,जनकल्याण हॉस्पीटल मधे असलेल्या सुविधांची सर्व ग्रामस्थांना माहिती दिली,अल्प दरात ,उच्च प्रतीचे उपचार करण्यात येतात हे सांगितले, डॉ आभिजित नामदे,फिजिशियन यांनी वैयक्तिक , सार्वजनिक स्वछता, व आरोग्य विषयक माहिती दिली. साधारण २०० ते २५० च्या वर घरामधे ग्रामपंचायतने घेतली काळजी घेवून डेंगु डास फवारणी,कोरडा दिवस असे वेगवेगळे केले उपाय व डेंगुचा प्रभाव कमी करण्याचे प्रयत्न केले हे काम सरपंच सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे व गावातील सर्व पदाधिकारी ,सदस्य,यांनी केले गावकऱ्यांना आव्हान कोरडा दिवस पाळा आणि डेंगु हिवताप टाळा. जनकल्याण हॉस्पिटल ने मोफत औषधोपचार शिबीर घेवून गावातील ११४ लोकांना मोफत उपचार केले यावेळी डॉ.अभिजीत नामदे, फिजीशियन,डॉ सौ. जयश्री सुधीर शिनगारे ,डॉ..विजय मुढे श्री सद्दाम मणेरी, जनकल्याण हॉस्पिटल चा स्टाफ,सरपंच प्रति निधी सोमनाथ झांबरे,उपसरपंच गणेश शिंदे,सदस्य .सचिन कडलासकर, सदस्य हिम्मत कडलासकर, सदस्य चांगदेव पाटील, सदस्य मोहन‌ मोरे,सदस्य .विष्णु पाटील,सदस्य .विलास शिंदे,.नारायण शिंदे,.विठ्ठल कडलासकर, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे संचालक अरूण नलवडे,परमेश्वर झांबरे,हरिभाऊ शिंदे,भास्कर शिंदे,शहाजी शिंदे,तुकाराम झांबरे, बाळासो शिंदे,ज्ञानेश्वर झांबरे,महादेव कडलासकर ,दत्तात्रय झांबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.हॉस्पीटल चे उपक्रमाबाबत श्री सोमनाथ झांबरे सर,नारायण शिंदे व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!