पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या अविष्कार २०२३ स्पर्धे मध्ये पूजा चव्हाण सर्व प्रथम
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
पंढरपूर – रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभाग पंढरपूर यांनी शेती आणि पशुसंवर्धन या प्रवर्गातून प्रथम क्रमांक मिळवला विद्यापीठ स्तरावरील संशोधन अधिवेशन यंदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर येथे पार पडले. वनस्पतीशास्त्र विभागातील एमए एसएससी भाग दोनची विद्यार्थिनी कु. पूजा विष्णू चव्हाण हिने पिकांवरील कीटकनाशकांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी ऑर्गेनोसोल हे कीटकनाशकाचे उत्पादन तिने सादर केले होते
ह्या उत्पादनासाठी विद्यापीठ स्तरावर तिला प्रथम क्रमांक मिळाला आता तिची राज्यपातळीवर निवड झाली आहे. ऑर्गेनोसोल या उत्पादनासाठी वनस्पतीशास्त्र विभागतील सर्व प्राध्यापकांचे व विद्यार्थ्यांचे सहकार्य मोलाचे आहे. वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एन.एम.पिसे यांनी मार्गदर्शन केले आणि प्राचार्य डॉ. सी. जे. खिलारे यांनी सहकार्य केले. रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख कवडे सर, प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक मामलय्या व मोरे सर यांचेही वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले. (चौकट)* सध्याच्या वाढत्या आधुनिक शेती प्रणालीमध्ये होणाऱ्या हानिकारक कीटकनाशकांचा वापर हा वाढत चालला आहे. अतिवापर हा मानवी जीवनासाठी हानिकारक ठरू शकतो. त्यालाच पर्यायी म्हणून ऑर्गेनोसोल हे ऑरगॅनिक कीटकनाशक त्या विद्यार्थिनींनी व तिच्या सहकाऱ्यांनी तयार केले असून,जे की मानवी जीवनासाठी सुरक्षित आहे. हे तयार करण्यासाठी सर्व जैविक घटकांचा वापर करून ते कीटकांवरती अतिशय परिणामकारक कसे ठरू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे ऑर्गेनोसोल हे होय.]
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com