रोपळे येथे कायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या किमान समान शिबीर कार्यक्रमा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती पंढरपूर व पंढरपूर अधिवक्ता संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजीभाऊ बाबा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रोपळे बुद्रुक (ता.पंढरपूर) येथे जिल्हा न्यायाधीश एम. बी. लंबे, यांच्या मार्गदर्शनाखाली दिवाणी न्यायाधीश पी. पी. बागुल, यांच्या अध्यक्षतेखाली कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले होते विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींना कायदेविषयक लैंगिक अत्याचारांपासून १८ वर्षांखालील मुला-मुलांचे संरक्षण करण्याच्या हेतूने २०१२ मध्ये “प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्स्युअल ऑफेन्स” म्हणजे पोक्सो या कायद्याबाबत जनजागृती केली सदर शिबीरादरम्यान पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड अर्जुन पाटील यांनी शिबीराची प्रस्तावना केली. अधिवक्ता संघाचे सचिव यांनी इतर कायद्यांची माहिती दिली व कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष ॲड शशिकांत घाडगे यांनी केले या शिबीरास पंढरपूर अधिवक्ता संघातील पदाधिकारी, श्री. शिवाजीभाऊ बाबा पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक ए. के. गायकवाड, न्यायालयीन कर्मचारी वाय. बी. बोबे, व्ही. डी. ढोबळे, एस. एस. भोरे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.