शैक्षणिक

स्वेरीत ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २४’ हा तांत्रिक उपक्रम संपन्न

पंढरपूर प्रतिनिधी

५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभागपंढरपूर: गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ व ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ या दोन विभागांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर्स (आय ट्रिपल इ), द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (आयइआय), सोलापूर या व्यावसायिक संस्थांच्या सहकार्याने राष्ट्रीय स्तरावरील ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २४’ हा एक दिवशीय तांत्रिक उपक्रम संपन्न झाला. कोग्नो सोल्युशन कंपनीचे वरिष्ठ अभियंता सर्वेश रत्नपारखी यांच्या हस्ते ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २४’ या उपक्रमाचे उदघाटन झाले. यावेळी विशेष अतिथी म्हणून एसईएस पॉलिटेक्निक, सोलापूर चे वरिष्ठ व्याख्याते प्रा.एस.एम.टीपे उपस्थित होते. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजिलेल्या ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २४’ या उपक्रमाच्या समन्वयक डॉ. नीता कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा सांगितली. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए. तंबोळी यांनी इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाने अल्पावधीत घेतलेल्या गरुडझेपेची व तांत्रिक उपक्रम ‘ईसा’ अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्धल माहिती दिली. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार यांनी ‘इ स्क्वेअर-लॉजिक’ बद्दल माहिती दिली तसेच ईलाईटच्या उपक्रमांवर देखील प्रकाश टाकला. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी ‘विद्यार्थ्यांना कंपनीमध्ये काम करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आत्मसात करा तसेच या तांत्रिक क्षेत्रामध्ये काम करत असताना आपला जनसंपर्क वाढवा.’ असे आवाहन करून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. प्रमुख पाहुणे व उदघाटक वरिष्ठ अभियंता सर्वेश रत्नपारखी व एसईएस पॉलिटेक्निकचे प्रा. एस.एम.टीपे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २४’ अशा तांत्रिक स्पर्धेमुळे तांत्रिक संशोधन करण्यासाठी विशेष चालना मिळते. त्यासाठी अशा व्यासपीठावर अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्ह्यायला हवे. एका क्षेत्रात अपयश आले तर हताश न होता इतर क्षेत्रात करिअर करावे.’ असे सांगून त्यांनी तांत्रिक संशोधनातील महत्वाचे टप्पे सांगितले. ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’मध्ये पेपर प्रेझेन्टेशन, प्रोजेक्ट कॉम्पीटीशन, टेक्निकल क्वीझ, शॉर्ट व्हिडीओ क्लिप मेकिंग या स्पर्धा झाल्या तर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात प्रोजेक्ट कॉम्पीटीशन, पेपर प्रेझेन्टेशन, पोस्टर प्रेझेन्टेशन, विन टू बझ व प्रोग्रामिंग मेनिया या स्पर्धा झाल्या. सर्व स्पर्धांमधून यशस्वी गुणवंतांना एक हजार रुपये पासून पाच हजार रुपयापर्यंतची अशी दोन्ही विभागांची मिळून एकूण पन्नास हजार रुपयापर्यंतची बक्षिसे व प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आली. या एक दिवसीय तंत्रस्पर्धेत कर्नाटक राज्यासह महाष्ट्रातील विविध जिल्ह्यामधील महाविद्यालयांतील जवळपास ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाच्या अनुषंगाने दोन्ही विभाग आकर्षक पद्धतीने सजवले होते. अनेक विद्यार्थी नवनवीन संशोधन प्रकल्पाच्या सादरीकरणात गुंग होते. यावेळी दोन्ही विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातर्फे प्रा. जगदीश हल्लूर यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. यावेळी डिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. ओंकार जाधव, स्नेहा पिसे, वैष्णवी कदम, साक्षी शेटे, सायली चव्हाण, गणेश सुरवसे व डॉ. नीता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर इलेक्ट्रिकल विभागाचे समन्वयक प्रा. विजय पाटील यांनी आभार मानले.

स्वेरी इंजिनिअरींगच्या ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग’ आणि ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ या विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘इ स्क्वेअर-लॉजिक २ के २४’ या उपक्रमाचे उदघाटन करताना कोग्नो सोल्युशन कंपनीचे वरिष्ठ अभियंता सर्वेश रत्नपारखी सोबत डावीकडून डॉ. एन.डी. मिसाळ, वरिष्ठ व्याख्याते प्रा.एस.एम.टीपे, स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, सर्वेश रत्नपारखी, सौ.रत्नपारखी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!