नदीकाठच्या गावांना एक दिवसाआड तरी आठ तास वीज द्या. आ. समाधान आवताडे यांची जिल्हाधिकाऱ्याकडे मागणी
मंगळवेढा/ प्रतिनिधी
भीमा नदीमध्ये सध्या पिण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडले आहे मात्र त्या नदीकाठचा विद्युत पुरवठा फक्त दोनच तास केला असून त्या दोन तासांमध्ये शेतकऱ्यांना पुरेसं पाणी मिळत नाही अनेक शेतकऱ्यांच्या पाच ते दहा किलोमीटर अंतर पाईपलाईन आहेत दोन तासांमध्ये त्या पाईपलाईन मधून पाणीही बाहेर पडेनासे झाले आहे त्यामुळे रोज दोन तास वीज पुरवठा सोडण्याऐवजी एक दिवसाआड आठ तास वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात आमदार अवताडे यांनी असे म्हटले आहे की उन्हाची दाहकता वाढत असून नागरिक व जनावरांचे पिण्याच्या पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत प्रशासनाने काही भागात दोन तास तर काही भागात चार तास विद्युत पुरवठा चालू ठेवलेला आहे मात्र या दोन व चार तासाच्या कालावधीमध्ये पुरेसा विद्युत प्रवाह उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी माझ्याकडे दोन व चार तासाऐवजी सलग आठ तास विद्युत पुरवठा द्यावा अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी करत आहेत महावितरण विभागाकडून सुरू असलेल्या दोन व चार तास विद्युत पुरवठा ऐवजी एक दिवस सलग आठ तास विद्युत पुरवठा झाल्यास शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा त्रास कमी होऊन त्यांना दैनंदिन कामाचे नियोजन करता येईल तरी भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना एक दिवसाआड सलग आठ तास विद्युत पुरवठा करण्यासाठी महावितरण विभागास आदेश देण्यात यावेत अशा आशयाचे निवेदन आमदार समाधान आवताडे यांनी कुमार आशीर्वाद यांना दिले आहे
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*