महादेव कोगनुरे काँग्रेस पक्षात दाखल ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले स्वागत.
सोलापूर प्रतिनिधी .
एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. काँग्रेस भवन येथे काल हा प्रवेश कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
दक्षिण सोलापूर मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले एम के फाउंडेशन महादेव कोगनुरे हे काँग्रेस पक्षात दाखल झाल्याने दक्षिण मध्ये काँग्रेसचे बोल वाढले आहे यापूर्वी माजी आमदार दिलीप माने यांनीही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. मागील वेळेस काँग्रेसला निसटता पराभव करावा लागलेला होता. कोगनुरे ,दिलीप माने यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भविष्यात विधानसभेसाठी दक्षिण मधून काँग्रेसला चांगली ताकद मिळेल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना कोगनुरे म्हणाले मी माझ्या कार्यकर्त्यांच्या विचाराने राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करत आहे. काॅग्रेस पक्षात मला मानसन्मानपूर्वक प्रवेश मिळाल्याने मी माझ्या निर्णयावर समाधानी आहे, आता माझी समाजाप्रती जबाबदारी आणखीन वाढली आहे, ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडून पक्ष वाढीसाठी व समाजासाठी अहोरात्र परिश्रम घेईन. माझे कार्यकर्ते हीच माझी संपत्ती आहे. तसेच माझ्या सामाजिक कार्याला आता राजकीय ताकद मिळाली आहे. यापुढे राजकारणात राहून समाजकारण करताना समाजातील अंध, अपंग, निराधार,गरीब, गरजू व जळीतग्रस्त कुटुंबिय तसेच विविध माध्यमातून सामाजिक कार्य जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करीन.
दरम्यान, गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कोगनुरे यांचे आपल्या शेकडो समर्थकांसह वाजतगाजत काँग्रेस भवनात दाखल झाले. यावेळी एम के फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी महादेव कोगणूरे यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी माजी आमदार श्री दिलीपराव जी माने, जिल्हा कार्याध्यक्ष श्री ऍडव्होकेट नंदकुमार जी पवार, आमचे पाहुणे उमराणी चे श्री महादेव (सावकार) बहिरगोंडे, शहरअध्यक्ष श्री चेतन भाऊ नरोटे, ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक श्री बाबा मिस्त्री जी, विधानपरिषद आमदार वजाहत जी मिर्जा, बाळासाहेब जी शेळके,श्री विजयकुमार जी हत्त्तूरे, जिल्हाउपाध्यक्ष श्री राधाकृष्ण जी पाटील, माजी सभापती श्री अशोक जी देवकते, बाजार समिती संचालक श्री , श्री महादेव जी दिंडोरे, श्री योगीराज जी दिंडोरे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व एमके फाउंडेशनचे सर्व संचालक, सदस्य, पत्रकार बंधू उपस्थित होते
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com