सोलापूर

धुळे-सोलापूर मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत तरूण पत्रकाराचा मृत्यू

सोलापूर प्रतिनिधी

धुळे-सोलापूर महामार्गावर धुळे तालुक्यातील गरताड गावाजवळ कारला भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. यामध्ये अपघातात पत्रकार हर्षल भदाणे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघेजण जखमी झाले आहेत. अपघात झाल्यानंतर ट्रक चालकाने पोलिसांना माहिती न देता हा ट्रक सरळ धुळे शहरात आणला. या ठिकाणी देखील त्याने दोन दुचाकींना धडक दिली.राज्यात सर्वत्र हिट अँड रनचे प्रकरण गाजत असताना वेगाने जाणाऱ्या ट्रकने एका कारला धडक दिली. या धडकेत कारचा चक्काचूर झाला. अपघातात धुळे पत्रकार हर्षल भदाणे (ता. गरताड) यांचा मृत्यू झाल. तर कारमधील अन्य दोघे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर सदर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. यानंतर चालकाने ट्रक सरळ चाळीसगाव चौफुली मार्गे धुळे शहरात आणला. मात्र 12 पत्थर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे हा ट्रक तिथेच अडकला. या ठिकाणी देखील ट्रकने दोन दुचाकींना धडक दिल्यामुळे मोठी गर्दी गोळा झाली. दरम्यान गरताड येथे झालेल्या अपघाताची माहिती पोलिसांना कळाल्यामुळे पोलिसांनी देखील ट्रकचा शोधासाठी ठिकठिकाणी पथके तैनात केली होती. अखेर हा ट्रक धुळे शहरातील 12 पत्थर चौकातून पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या पथकाने ताब्यात घेतला.अपघाताची माहिती मिळाल्याने परिसरात मोठी गर्दी झाली. यातील काहींनी ट्रकच्या काचेवर दगड देखील फेकले. यातील एक दगड धुळे शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी जावेद शेख यांना लागल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे. मात्र गरताड स्थित पत्रकार हर्षल भदाने यांचे या अपघातात दुर्दैवी निधन झाल्यामुळे सर्वच स्तरावरून हळहळ व्यक्त केली जाते आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!