अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त झालेल्या व्याख्यानातून मिळाली हजारो पंढरपूरकरांना नवी ऊर्जा
पढरपूर प्रतिनिधी
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांच्या संकल्पनेतून विठ्ठल प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त सुप्रसिद्ध व्याख्याते, पत्रकार संजय आवटे व व्याख्याते सुरेश पवार यांच्या व्याख्यानास शिवतीर्थ, पंढरपूर येथे हजारो पंढरपूरकरांनी अहिल्यादेवींचा जाज्वल इतिहास जाणून घेतला..पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी तत्कालीन काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आजही देखील आश्चर्य वाटावे अशा सोयी-सुविधा अहिल्याबाईंनी रयतेसाठी निर्माण केल्या होत्या
हाती तलवार घेऊन लढा दिला. अहिल्याबाईंनी जाती-धर्मापेक्षा गुणवत्तेला महत्त्व दिले
जल व्यवस्थापन केले. अनेकांसाठी पानपोया उभारल्या. त्यांच्या कर्तृत्वाचा आणि सकारात्मक विचारांचा वारसा तुम्ही-आम्हीच जपला पाहिजे. कारण हा देश तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्यांचा आहे. असे विचार त्यांनी आपल्या संबोधनातून व्यक्त केले..हे व्याख्यान श्रोत्यांना निश्चितच पुढील जीवनासाठी विशेष प्रेरणा देणारे आणि दिशादर्शक होणारे ठरेल हा विश्वास विठ्ठल प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला
यावेळी स्वेरीचे सचिव डाॅ.बी.पी.रोंगेसर, मा. नगराध्यक्ष सुभाष भोसले, मा.नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, नगरसेवक श्रीनिवास बोरगावकर, संतोष बंडगर, आनंद पाटील, विठ्ठल पाटील, संदीप मांडवे, पंकज देवकते, रायाप्पा हळणवर, प्रशांत घोडके, रामभाऊ गायकवाड, संतोष सर्वगोड, अण्णा महाराज भुसनर, विठ्ठल कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, तुकाराम मस्के, धनाजी खरात, सिद्धेश्वर बंडगर, प्रवीण कोळेकर, तसेच सोमनाथ ढोणे, नितीन काळे, संजय लवटे, संतोष शेडगे, बाबा येडगे, गणेश जाधव यांसह आदी मान्यवर उपस्थित होते…
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com