मोहोळ नगरपरिषदेने उपविभागीय अधिकारी पंढरपूर यांना सादर केला टँकर मागणीचा प्रस्ताव
वरती मागून घोडे नाचवण्याचा नगरपरिषदेचा केविलवाना प्रयत्न :- सीमा पाटील
राजेश शिंदे मोहोळ प्रतिनिधी
मोहोळ : – मोहोळ शहराची लोकसंख्या सुमारे ५० हजारावर गेली असून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अष्टे कोळगाव बंधारा पूर्णपणे कोरडा पडल्याने मोहोळ शहरासह परिसरातील वाड्यावर गेल्या सहा महिन्यापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून शहरातील जनावरांसह नागरिकांना पाण्यासाठी तीव्र भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे , नगर परिषदेने तात्पुरत्या उपाय योजना केल्या परंतु पाणी पातळी खाली गेल्याने सर्व पाणीपुरवठा यंत्रणा कोलमंडली असून शहरातील नळधारकांना महिन्यातून एकदा दोनदा पाणी मिळते शहरातील नागरिकांना पाण्याचा कर वेळेवर भरूनही पाणी विकत घेण्याची वेळ आली असून शहरातील सर्व हातपंप, विहिरी कोरड्या पडल्याने पैसे देऊनही नागरिकांना पाणी वेळेवर मिळत नाही, शहरामध्ये अनेक भागातून पाण्यासाठी महिलांचे मोर्चे निघाले, परंतु शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हाप्रमुख सीमा पाटील यांनी सतत प्रशासनाच्या पाठीमागे आंदोलनाचा रेटा लावत मोहोळ नगरपरिषद प्रशासनाला वरिष्ठ कार्यालयाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव सादर करण्यास भाग पाडले, व काही अंशी सीमा पाटील यांच्या मागणीला यश आलेगेल्या सहा महिन्यापासून आ. प्रणितीताई शिंदे , जिल्हाधिकारी सोलापूर, प्रांताधिकारी पंढरपूर, तहसीलदार मोहोळ, मोहोळ नगर परिषद प्रशासक, यांच्याकडे मोहोळ शहराला टँकरद्वारे पाणीपुरवठा मागणी करण्याची अनेक आंदोलन करण्याच्या पत्राद्वारे केली होती , तथापि मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी १५ मे नंतर टँकरचे प्रस्ताव सादर करा असे सांगितल्याचे समजते ,परंतु आज ३० मे असूनही अद्याप नगरपरिषदेने भीषण पाणी टंचाई सदृश्य मोहोळ शहरासाठी टँकर प्रस्ताव सादर केला नाही, या कारणास्तव पुनश्च सीमा पाटील यांनी आज मोहोळ शहरातील महिला भगिनींना घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता परंतु त्याआधीच आज आंदोलनाच्या अनुषंगाने नगरपरिषदेने वरिष्ठ कार्यालयाकडे तात्काळ दैनंदिन ५००००० लाख लिटर पाण्यासाठी टँकर मागणीचा प्रस्ताव दाखल केल्याचे पत्र सीमा पाटील यांना मा. मुख्याधिकारी यांनी दिल्याने आज होणारे आंदोलन स्थगित करण्याचे पत्र माजी नगरसेविका सीमा पाटील यांना दिले या अनुषंगाने आज होणारे आंदोलन स्थगित केले आहे यावेळी मोहोळ नगरपरिषद प्रशासनाचे सीमा पाटील यांनी आभार मानले
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*