शैक्षणिक

कवठेकर प्रशालेत 5वी नूतन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशालेत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाची इयत्ता 5 वी च्या नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व औक्षण करून झाली.यावेळी शाळेचे मुख्यप्रवेशद्वार व सर्व वर्गांना फुलांच्या माळा व अत्यंत सनईच्या मांगल्य सुरात,सर्व फलकांवर विविध विद्यार्थी प्रेरित चित्रे व विचार विद्यार्थ्यांच्या आनंदात भर घालीत होते. शासकीय आदेशानुसार या वर्षीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत प्रशालेत अत्यंत आनंदाने व जल्लोषात करण्यात आले.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन व प्रशालेच्या शिक्षकभगिनी सौ.क्षिरसागर व सौ चुंबळकर यांच्याहस्ते औक्षण करून झाले.त्याचबरोबर उपमुख्याध्यापक श्री न.बा बडवे,ज्येष्ठ पर्यवेक्षक श्री सु.शि.रुपनर व ज्येष्ठ शिक्षिका सौ शु.र.कुलकर्णी त्याचबरोबर पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री नानामालक कवठेकर गतवर्षीचे पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष ह.भ.प.श्री नामदास व सहसचिवा सौ धनश्री उत्पात पालक प्रतिनिधी श्री नागेशभाऊ आधटराव,पंढरपूर तहसील मधील सौ घोडके या सर्वांच्या हस्ते नूतन विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले

आपल्या प्रस्तावित व स्वागतपर भाषणात मुख्याध्यापक श्री वि. या.पाटील यांनी मोबाइल व त्यांचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना सजग केले.ह.भ.प.नामदास महाराज यांनी आपल्या आशीर्वादपर मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना प्रशालेत आपल्याला यशाचा व उन्नतीचा मार्ग दाखविणाऱ्या प्रशालेच्या गुरुप्रति सतत नम्र राहण्याचे आवाहन केले.तर पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री नानामालक कवठेकर यांनी प्रशालेच्या नवीन उपक्रम व नियोजन स्पष्ट करून नवीन वर्षांच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या

कार्यक्रमाचे आभार ज्येष्ठ पर्यवेक्षक सौ शु.र कुलकर्णी यांनी मानले.व सूत्रसंचालन श्री शिवाजी मेडशिंगीकर यांनी केले. या स्वागत समारंभास प्रशालेचे आवार विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने व रंगीबेरंगी वेशभूषेने फुलून गेला होता.या समारंभास मोठया संख्येने पालक बंधू-भगिनी,प्रशालेचे शिक्षक बंधू-भगिनी व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!