सामाजिक

पालवी येथे प.पूज्य विश्वकल्याणजी महाराज गोशाळा उद्घाटन संपन्न.

पंढरपूर प्रतिनिधी श्री नंदकुमार देशपांडे

पालवी , पंढरपूर दि. 20 जून , गुरुवार रोजी विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प , पालवी या ठिकाणी “परमपूज्य विश्वकल्याणजी महाराज गोशाळे” चा शुभारंभ झाला. यावेळी गोठ्यातील गोमातेला पुरणाचे उंडे अर्पण करून नवीन गोठ्यात प्रवेश करण्यात आला. सद्यस्थितीत आठ गोमाता यांची या गोशाळेत सेवा सुरू करण्यात आली आहे..पालवी प्रकल्पात शेकडो अनाथ निराधार बालके आपले जीवन आनंदाने जगत आहेत… या प्रकल्पात अगदी एका दिवसाच्या बाळापासून 80 वर्षाच्या वयोवृद्ध आजी-आजोबा देखील आहेत.या नवजात शिशू साठी सातत्याने दूध पावडर लागते…. म्हणतात ना ‘गाईचे दूध हे आईसमान असतं…’ आणि म्हणूनच गोसेवा व्हावी व बाळांनाही एक सकस पूर्ण आहार म्हणून गाईचं दूध मिळावं यासाठी देशी गाईंची पालवीमध्ये एक गोशाळा उभारली आहे..यावेळी पालवी प्रकल्पाच्या संचालिका सौ.मंगलताई शहा (बई)वकील- सौ. ऋतुजा शहा, श्री आशिष शहा, श्री सुहास पाटील श्री संगम पवार आदी मान्यवर उपस्थित होते…*अधिक माहितीसाठी संपर्क पालवी प्रकल्प , कोर्टी रोड , पंढरपूर ✪संपर्क✪- ९६७३६६४४५५ ९८६००६९९४९* www.palawi.org स्पर्श मायेचा ◆ पालवी आपुलकीची

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!