नियोजन समितीच्या निधी मधून केलेल्या चांगल्या कामांची यादी तयार ठेवा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील
प्रत्येक शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना आदेश
पंढरपूर प्रतिनिधी श्री नंदकुमार देशपांडे
वारीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या कामांसाठी नियोजन मधून निधी उपलब्ध करणार जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्याकडून आषाढी वारीच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती बैठकीत सादरश्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह अन्य संतांच्या पायी दिंडी पालखी सोहळ्याबरोबर मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक चालत येतात. पायी पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी पालखीमार्गावरील सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी जास्तीचे कामगार लावावेत, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आषाढी वारी पूर्व नियोजनाबाबत नियोजन भवन सोलापूर येथील बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकुर, निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार,सा.बां. अधिक्षक अभियंता संजय माळी, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे केशव घोडके यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.पालखी मार्गावर शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा हवा यासाठी व्यवस्थापनाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. वारी कालावधीत सार्वजनिक व खाजगी 24 हजार 682 शौचालयांची उपलब्धता करण्यात येणार असून, शौचालय स्वच्छतेसाठी कर्मचाऱ्यांचा आवश्यक यंत्रणेची उपलब्धता करण्यात येणार आहे.यंदा आषाढी सोहळ्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार असून मंदिर व शहरातील प्रमुख रस्त्याच्या झाडावरती तसेच वाळवंटात विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. गर्दी व्यवस्थापन आणि शोध व बचावासाठी तीन ड्रोनचा वापर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सरदेशपांडे म्हणाले, पालखी सोहळा कालावधीत भाविकांना पायी चालताना कोणत्याही अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलिस प्रशासनाकडून काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. आषाढी यात्रा कालावधीत वाळवंट, महादर घाट, प्रदक्षिणामार्ग, नामदेव पायरी, चौपाळा,६५ एकर या गर्दीच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था नेमण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आमदार समाधान आवताडे यांनी वारी कालावधीत पंढरपूर शहरात शौचालयाची संख्या पुरेशी ठेवून सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती दुप्पट प्रमाणात करावी, अशी मागणी करून भाविकांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध कराव्यात असे सांगितले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com