घरगुती गॅस सिलेंडर मधून रिक्षात गॅस भरताना दोघांवर कारवाई
5 गॅस सिलेंडर, मोटार जप्त; प्रांत, तहसील, पोलीस यांच्या संयुक्त पथकाची कारवाई
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर शहर हे तिर्थक्षेत्र असल्याने शहर परीसरामध्ये मोठया प्रमाणात गर्दी असते, सदर गर्दीमध्ये घरगुती सिलेंडरचा अवैधरीत्या वापर केल्यास मानवी जिवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरची बाब लक्षात घेवुन आज दिनांक ११/०७/२०२४ रोजी मा. सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी पंढरपूर विभाग, पंढरपूर, मा. तहसिलदार पंढरपूर श्री. सचिन लगुंटे तसेच पोलीस निरीक्षक, पंढरपूर शहर पोलीस ठाणे श्री. विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरात अवैधरित्या वाहनामध्ये घरगुती गॅसचा भरना होत असलेल्या ठिकाणी कार्यवाही करण्यात आली. पुरवठा निरिक्षक श्री सदानंद नाईक, श्री. पिसाळ, पोलीस उपनिरीक्षक, श्री. आवटे, पोलीस कॉन्सेबल तसेच तहसिल कार्यालयातील शिपाई श्री. भाऊसाहेब शिंदे व कोतवाल श्री. प्रल्हाद खरे यांचे सयुक्त पथक पंढरपूर येथील गाडगे महाराज चौक, भक्ती मार्ग लगत असलेल्या गाळ्यात अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर मधुन रिक्षामध्ये भरत असल्याची माहीती मिळाल्याने सदर ठिकाणी गेले असता गोटू ऊर्फ निलेश कृष्णा राजुरकर वय ३२ वर्षे रा. टाकळी रोड, पंढरपूर या इसमास घरगुती वापरातील एकुण ०३ सिलेंडर व टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक मोटार (अंदाजे रक्कम १४९००/- रू) या मुदेमालासह रंगेहात पकण्यात आले.तसेच अनिल नगर झोपडपट्टी पाण्याच्या टाकीजवळ एका घरामध्ये घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधून गॅस रिक्षामध्ये भरत असुन तेथे अवैधरीत्या गॅस विक्री करत असल्याची माहीती मिळाल्याने तातडीने वरील पथक सदर ठिकाणी पोहोचले असता, एक बंद खोलीत २ घरगुती गॅस सिलेंडर, इलेक्ट्रीकल वजन काटा तसेच टाक्यातील गॅस काढून वाहनांमध्ये भरण्यासाठी लागणारे इलेक्ट्रीक मोटार असे एकुण १४६००/- रू.चे साहित्य मिळुण आले. सदरची खोली हि नागेश जाधव यांची असून सदरचा मुद्देमाल हा त्यांचाच असलेले समजले. दोन्ही ठिकाणचे सविस्तर वेगवेगळे पंचनामे तयार केले आहेत. वरील कार्यवाहीच्या अनुषंगाने १) गोटू ऊर्फ निलेश कृष्णा राजुरकर वय-३२ वर्षेद २) नागेश जाधव वय ४५ दोघा विरूदध जिवनांवश्यक वस्तु कायदा १९५५ च्या कलम ३ व कलम ७ अन्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच मंदिर परिसरात हॉटेल विक्रेते यांना घरगुती गॅसचा वापर न करता व्यवसायीक गॅस सिलेंडरचा वापर करण्याचे प्रशासनामार्फत आव्हाहन करणेत आले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*