!! कृषी पंढरी !! कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महा महोत्सव – 2024
प्रतिनिधी नंदकुमार देशपांडे
श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी एकादशी निमित्त दि. 15 ते 19 जुलै अखेर आयोजित केलेल्या 06 व्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक कृषी महा महोत्सववाचे भव्य उदघाटन सोहळा मंगळवार दि 16 जुलै रोजी दुपारी 4 वाजता राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या शुभहस्ते व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व कृषी मंत्री मा. ना.धनंजय मुंडे तसेच पणनमंत्री मा.ना.अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे….!
आज कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये जाऊन कृषी प्रदर्शनाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला व या प्रदर्शनाचा पंढरपूर मध्ये आलेल्या सर्व वारकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी भेट देऊन लाभ घ्यावा असे आव्हान केले ..!
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक तसेच पांडुरंग परिवारातील पदाधिकारी आदी उपस्थित होते…!