सामाजिक

मुख्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ राजू खरे यांच्याकडून स्वखर्चाने अन्नदान.

पंढरपूर प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या मातोश्री स्व. गंगुबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ आषाढी वारीतील भाविकांना मोफत अन्नछत्र खुले केले – आहे. या अन्नछत्राचे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन राजू खरे यांनी स्वागत केले. – यावेळी मुख्यमंत्री यांनी या उपक्रमाचे – कौतुक केले.उद्योजक राजू खरे यांनी स्वखर्चातून हे अन्नदान सुरू ठेवले आहे. मोहोळमधील उद्योजक राजू खरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्रींचय नावाने अन्नदान सुरु ठेवले आहे. खरे यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत अनेकांना मदत करण्याचा त्यांचा नेहमीचाच पायंडा आहे. यामुळे पांढरीत वारीसाठी आलेल्या लोकांना मोफत भोजन देण्यासाठी या वारीत सुरुवात केली आहे. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, सकल मराठा समाजाचे महेश डोंगरे, दिपक वाडदेकर, माजी सरपंच विलास मस्के, पांडुरंगचे संचालक दिलीप गुरव, अरुण बनसोडे, गणश बनसोडे, रामहिंगणीचे संभाजी लेंगरे, समाधान बाबर, सचिन आसबे, मनोज गुरव, उपसरपंच बाळासाहेब आसबे, उपसरपंच गणेश नामदेव, समाधान यादव, गुंडु पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!