उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज ऑनलाईन द्वारे सबमीट
महिलांनी सरकारच्या निर्णयाचे केले स्वागत
मोहोळ ( प्रतिनिधी ):
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आ. राजन पाटील, आ. यशवंत माने, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुका अध्यक्ष प्रकाश चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ अंतर्गत ऑफलाईन व ऑनलाइन फॉर्म भरण्यात आले.* या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी मोहोळ शहराध्यक्षा यशोदा कांबळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या म. आ. सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती घाडगे यांनी केले होते. यावेळी मोहोळ शहरातील विविध भागातील महिला भगिनीचे ऑफलाईन व ऑनलाइनद्वारे अर्ज भरण्यात आले. महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर करण्यासाठी तसेच अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा व्हावी कुटुंबाना उदरनिर्वाह भागविता यावा व त्यांना आधार मिळावा म्हणून अर्थसंकल्पत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ‘ ही योजना महाराष्ट्रात राबवून महाराष्ट्रातील तमाम महिलांना खूप मोठा आधार दिला आसल्यांचे सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षा प्रीती घाडगे यांनी देत शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत महिला भागिनींनी सरकारचे अभिनंदन केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून घरोघरी भेटी देत महिला भगिनींचे ऑफलाईन व ऑनलाईन द्वारे अर्ज भरण्यासाठी यशस्वी प्रयत्न करणार असल्याचे सांगत लाभापासून महिला अलिप्त राहणार नाही या संदर्भात जनजागृती, प्रचार व प्रसार करणार असल्यांचे यशोदा कांबळे यांनी सांगितले.