शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वृद्धिंगत व्हावा – तहसिलदार सचिन मुळीक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पहिल्या पात्र ठरलेल्या प्रिती घाडगे यांना महसूल दिनी ॲप्रोल प्रमाणपत्र वाटप
मोहोळ ( प्रतिनिधी ):
महसूल विभागाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाद्वारे राबविण्यात येणारे विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती व्हावी आणि त्यांना योजनांचा योग्य लाभ घेता यावा याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी आणि शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने लोकाभिमुख उपक्रम आयोजित करण्यात आलेची माहिती मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.* मोहोळ तहसील कार्यालय येथे महसूल दिनाचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी मुळीक बोलत होते. या कार्यक्रमासाठी मोहोळ गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे, महसूल नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, एकात्मिक बाल विकास अधिकारी किरण सूर्यवंशी, मोहोळचे तलाठी दिनेश साळुंखे, अजिज आवटे आदि. प्रमुख अधिकारीसह कर्मचारी उपस्थित होते. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत ‘ पहिल्या पात्र झालेल्या सौ. प्रिती राजन घाडगे यांना तहसीलदार सचिन मुळीक यांच्या शुभहस्ते ॲप्रोल प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांना अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी व समस्या तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी आनंदकुमार मिरगणे यांनी जाणून घेतल्या व महिलांचे अर्ज प्रलंबित राहणार नाहीत याबाबत योग्य ते नियोजन करावे असे उपस्थित अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करण्यात आले. पर्यवेक्षिका सुनल गायकवाड. रशिदा शेख, दिपाली कदम, शमशाद तांबोळी, कविता हावळे, मनीषा घाडगे, राजश्री केवळे, शकीला हुंडेकरी, बेबी गोडसे, शितल जगताप, आदि. अंगणवाडी सेविका उपस्थित होते.