247 मोहोळ (राखीव)विधानसभा मतदार संघातून अँड.गजेंद्र(मयुर) गौतम खरात यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज दाखल करून उमेदवारी देण्याची मागणी केली.
मोहोळ प्रतिनिधी
दिनांक:- ०३ ऑगस्ट २०२४विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४, २४७ – मोहोळ (राखीव)विधानसभा मतदारसंघातून सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष अँड.गजेंद्र(मयुर) गौतम खरात यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून रितसर इच्छुक उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अँड.नंदकुमार पवार यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापुर येथे सूपूर्त केला. ॲड.गजेंद्र(मयुर)खरात हे कालकथित गौरव( बाबा ) खरात यांचे बंधु असुन त्यांचा सामाजिक व राजकीय वारसा अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे घेवून जात आहेत तसेच ॲड.गजेंद्र(मयुर)खरात हे मोहोळ तालुक्यातील येणकी गावचे रहीवासी असून उच्चशिक्षित आहेत तसेच आपल्या वकीलीच्या तसेच समाजसेवेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या अडी- अडचणी सोडविण्यासाठी नेहमी तत्पर असतात,यापूर्वी कालकथित गौरव खरात हे 20 वर्षापासुन काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ कार्य करीत होते. आदरणीय देशाचे नेते सुशिलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांनी त्यांना सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या विविध पदांवर कार्य करण्याची संधी दिली त्या संधीचे त्यांनी चांगल्या पद्धतीने काम करून काँग्रेसचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याचे काम केले याची पावती म्हणून त्यांना 2014 साली काँग्रेस पक्षाकडून मोहोळ विधानसभेची उमेदवारी दीली होती. कालकथित गौरव खरात यांचे अपघाती निधन झाल्यानंतर देशाचे नेते आदरणीय सुशिलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांनी ॲड.गजेंद्र (मयुर) खरात यांना सोलापूर जिल्हा काँग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक केली. त्यानंतर ॲड.गजेंद्र(मयुर) खरात यांनी अनुसुचित जाती विभागाचा जिल्हाध्यक्ष म्हणून पदभार घेतल्यापासून सोलापूर जिल्हा व मोहोळ तालुक्यातील दीन- दलित, गोर-गरीब,कष्टकरी, शेतकरी, महिलांच्या अडचणी सोडविण्याचे काम केले. त्यामुळे मोहोळ तालुक्यातील सर्व स्तरांतून ॲड.गजेंद्र( मयुर) खरात हे मोहोळ तालुक्याचे स्थानिक असुन ते उच्चशिक्षित असल्यामुळे तसेच सर्वसामान्यांच्या अडी-अडचणींना धावून जाणाऱ्या स्वभावामुळे मोहोळ तालुक्यातून उमेदवारी द्यावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे आजरोजी देशाचे नेते आदरणीय सुशिलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणितीताई शिंदे यांचे आशिर्वाद घेवून २४७ मोहोळ ( राखीव) विधानसभा मतदारसंघातुन काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीचा अर्ज दाखल केला. यावेळी प्रदेश व काँग्रेसचे सचिव नगरसेवक विनोद भोसले, सोलापूर जिल्हा काँग्रेसचे संघटक रमेश हसापूरे, जिल्हा उपाध्यक्ष मोतीराम चव्हाण, रशीद शेख,शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे,शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाबा करगुळे, तिरुपती परकीपंडला, राज सलगर, प्रशांत कांबळे,मोहोळ तालुका युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आरीफ पठाण, प्रशांत पल्ली,युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संजय भाऊ गायकवाड, शिवशंकर अंजनाकर,मोहोळ अनुसुचित जाती विभागाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव, अतुल मोरे , आकाश राठोड, हर्षदीप गायकवाड , शाहु सलगर ,अजिंक्य गायकवाड, राजकुमार राठोड, नितीन रॉक होळेकर, गौरव बनसोडे, सुभाष वाघमारे,बाळासाहेब कांबळे, सुमित जाधव,महेश चलवादी,प्रयास गायकवाड,अभिजीत आठवले,विराट वाघमारे,रूद्र बेसरे, आकाश बनसोडे, शुभम सोनवणे इ. उपस्थित होते.