कर्मयोगी मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी कॅप राऊंड 3 चे ऑप्शन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू
पंढरपूर प्रतिनिधी
पहिल्या व दुसर्या फेरीमध्ये कर्मयोगीला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद.शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्ष पदवी इंजिनियरिंग प्रवेशासाठी कॅप राऊंड – ३ चे ऑप्शन फॉर्म भरण्याची मुदत दि ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबर अशी आहे. ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या व दुसर्या फेरीमध्ये कॉलेज मिळाले नाही किंवा ज्यांनी बेटरमेंट केले असेल असे विद्यार्थी तिसर्या फेरीमध्ये फॉर्म भरण्यासाठी पात्र असतील. कर्मयोगी इंस्टीट्यूट शेळवे येथे ही सुविधा मोफत राबविण्यात येणार आहे अशी माहिती महाविद्यालचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील यांनी दिली. याबद्दल अधिक माहिती देताना महाविद्यालयाचे प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ.अभय उत्पात म्हणाले की कर्मयोगी महाविद्यालयामधील टिचिंग पॅटर्न, प्रशस्त कॅम्पस, नैसर्गिक वातावरण, विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार्या नोकरीच्या संधी आदि बाबींचा विचार करून पहिल्या व दुसर्या फेरीमध्ये विद्यार्थी व पालकांनी कर्मयोगी ला सर्वाधिक पसंती देऊन प्रवेशासाठी उदंड प्रतिसाद दिला आहे. तरीही ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या दोन फेरीमध्ये कुठेच प्रवेश मिळाला नाही किंवा पसंतीचे कॉलेज मिळाले नाही अश्या विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असणार आहे. कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये एकूण जागेपैकी काही मोजक्याच जागा शिल्लक असून विद्यार्थ्यानी सर्व बाबींचा विचार करून तिसर्या राऊंड चे ऑप्शन फॉर्म काळजीपूर्वक भरावेत. यासाठी कर्मयोगी इंस्टीट्यूट शेळवे येथे विद्यर्थ्यांना मार्गदर्शन करून फॉर्म भरण्याची मोफत सोय केली आहे याचा लाभ घ्यावा असे ही ते म्हणाले. यासाठीच्या अधिक महितीसाठी डॉ अभय उत्पात (९१५८३२५०५५) व प्रा.जगदीश मुडेगावकर (९४२१०९०८०५) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.