सामाजिक
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर, दि:05– राज्याच्या महिला व बालविकास अदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री,महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी समाधान नागणे , नायब तहसीलदार वैभव बुचके, विजय जाधव तसेच मान्यवर पदाधिकारी यांच्यासह मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.