पुरस्कारामुळे ऊर्जा निर्माण होते .राधिका शिलेदार
,,,,सोलापूर जिल्हा, प्रतिनिधी, प्रकाश इंगोले, पंढरपूर,,,,,,,,,
डोंगरगाव-: आयुष्यामध्ये काम करत असताना निरपेक्ष वृत्तीने सेवा करणे एवढे च आपणास माहीत असून पुरस्कारामुळे नविन ऊर्जा निर्माण होते असे प्रतिपादन केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरगाव ता. मंगळवेढा येथील सहशिक्षिका राधिका शिलेदार यांनी केले.
प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा सावित्रीची लेक हा पुरस्कार राधिका शिलेदार यांना मिळाल्याबद्दल डोंगरगाव येथील ग्रामस्थ, पालक व विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी सत्काराला उत्तर देताना शिलेदार बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष डी. के.साखरे होते. प्रारंभी शिलेदार यांना मानाचा फेटा बांधून तसेच शाल व गुलाबपुष्प देऊन डी. के.साखरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना डी. के.साखरे म्हणाले की , शिलेदार मॅडम या भाग्यवान असून त्यांना सावित्रीची लेक म्हणून मान मिळाला. कोणतेही काम माणसाने सरळ व प्रामाणिकपणे केले की त्याचे फळ हे मिळतेच.शुध्द सोन्याचे शंभर तुकडे केले तरी त्याची किंमत कमी होत नाही तसेच चांगल्या माणसांना मिळणारा मान कधीच कमी होत नाही. या शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील हे झपाटलेल्या व्यक्तिमत्वाचे असून त्यांचे व त्यांच्या सर्व सहकारी शिक्षक शिक्षिकांचे कार्य कौतुकास्पद आहे. ते जे काम करतात ते जीव ओतून करतात,शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी ते करत असलेले काम डोंगरगाव ग्रामस्थांच्या कायम लेखी राहील .
यावेळी शाळेच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिका अमृता कुलकर्णी यांच्या हस्ते शिलेदार यांचा सत्कार करण्यात आला.तर सहशिक्षिका कविता वाघमारे,अंबिका कर्वे ,मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिलेदार यांच्या कामाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी पोलीस पाटील पांडुरंग खडतरे, कृषी विकास फौंडेशन चे संस्थापक पंकज मस्के, सागर राऊत, संभाजी मेटकरी, सत्यवान शिंदे ,तानाजी मिसाळ ,सुरेश भुसे व सहशिक्षक अनिल पाटील आदी उपस्थित होते.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१