महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने प्रशासनाचा निषेध करत पंढरपूरातील पुलावर पडलेल्या खड्यात होळीचे दहन
24 मराठी न्यूज मुख्य संपादक श्री लखन साळुंखे
पंढरपूरातील जुन्या ऐतिहासिक पुलावरील पडलेल्या खड्यात महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने होळी पौर्णिमा निमित्त कचरयाची होळी करून शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. कित्येक वर्षांपासून या जुन्या पुलावरील रस्त्यावर खड्डे पडले आहेत पण शासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. आम्ही वेळोवेळी झोपलेल्या प्रशासनाला जागं करण्याचं काम केलय पण या प्रशासनाला जाग येत नाही त्यासाठी आम्ही आज होळी पौर्णिमा निमित्त कचरयाची होळी करत आहोत असं गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे. हजारो भाविक भक्त या पुलावरून दररोज ये जा करत आहेत. ग्रामीण भागातील नागरिक या पुलाचा वापर करतात. काही वारकरी भाविक भक्त पायी चालत नदीवर पुंडलिकाचे दर्शन घेण्यासाठी या पुलाचा वापर करतात पण या पुलावरील रस्त्यावर पडलेल्या खड्यामुळे त्यांना त्रास होत आहे. कित्येक वेळा या ठिकाणी अपघात घडला आहे. याला जबाबदार कोण असही यावेळी गणेश अंकुशराव यांनी म्हटले आहे. या जुन्या पुलासाठी आम्हाला अनेक आंदोलने करायला लागतील वेळ प्रसंगी उपोषणाला बसावे लागेल व उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल असा इशारा ही यावेळी गणेश अंकुशराव यांनी प्रशासनाला दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास उपळकर, कृष्णा कवडे, सोमनाथ नेहतराव, प्रल्हाद करकमकर, औदुंबर अभंगराव, लल्लू वाघमारे, सिध्देश्वर कोळी, शेखर अभंगराव, भैय्या सुरवसे, अनंता गुरसाळकर व अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१