सामाजिक

शिवसेनेच्या तालुका प्रमुखपदी भोसले तर जिल्हाप्रमुखपदी चरवराज चवरे यांची निवड .

24 मराठी न्यूज मोहोळ प्रतिनिधी राजेश शिंदे

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी पंढरपुर , सांगोला ) यांची , मार्गदर्शनाखाली ( मोहोळ , चरणराज चवरे तर मोहोळ तालुका प्रमुखपदी प्रशांतबापू भोसले यांची निवड करण्यात आली आहे . निवडीनंतर प्रशांत भोसले समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला

.पेनूर येथील चरणराज चवरे यांची मुख्यमंत्री शिंदे गट शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी निवड करण्यात आली . तरखवणी येथील प्रशांत भोसले यांची मुख्यमंत्री शिंदे गट शिवसेनेच्या मोहोळ तालुकाप्रमुख निवड करण्यात आली .त्याबाबतचे पत्र शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या वतीने सचिव संजय मोरे यांनी त्यांना दिले . जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या विविध निवडी मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयात जाहीर करण्यात आल्या

यामध्ये पेनूर येथील चरणराज चवरे यांना मोहोळ , पंढरपूर व सांगोला या तीन तालुक्यांच्या जिल्हाप्रमुखपदाची – जबाबदारी देण्यात आली आहे . यावेळी जिल्हाप्रमुख मनीष काळजे , सोलापूर शहर प्रमुख मनोज शेजवाल , मोहोळ तालुकाप्रमुख प्रशांत भोसले आदींसह सोलापूर जिल्ह्यातील शिंदे समर्थक उपस्थित होते . 

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!