
24 मराठी न्यूज सांगोला प्रतिनिधी
क्रांतीवीर वि. दा. सावरकर विद्यालय चिणके ता. सांगोला येथील गरजू विद्यार्थ्यांना आपुलकी प्रतिष्ठान सांगोला यांचे वतीने सायकल वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. ग. भि. मिसाळ होते तर प्रमुख अतिथी म्हणून आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव होते. यावेळी बोलताना डॉ. मिसाळ म्हणाले, समाजातील कमकुवत असणाऱ्या घटकाला मदत करण्याची भावना ज्याच्या मनात येते ती चांगुलपणाची भावना असते. आपुलकी प्रतिष्ठानच्या कामाला जोड नाही कारण, समाजातील कमकुवत घटक शोधणं ही फार मोठी कौशल्याची गोष्ट आहे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणारी आपुलकी प्रतिष्ठानची मंडळी आहे. आमची शाळा सांगोला शहरापासून दूर आहे परंतु आमच्या शाळेत दूरवरून चालत शाळेला येणाऱ्या विदयार्थ्यांची खरी गरज ओळखून आपुलकीने या सायकल दिल्यामुळे मनस्वी आनंद होत असल्याचे डॉ. मिसाळ यांनी सांगितले. यावेळी अध्यक्ष राजेंद्र यादव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.प्रमुख अतिथीचे स्वागत व सत्कार डॉ. ग. भि. मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी प्रमोद दौंडे, राजेंद्र दिवटे, अरविंद डोंबे गुरुजी, विकास देशपांडे, महादेव दिवटे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक सहदेव ऐवळे यांनी सर्वांचे स्वागत केले. सूत्रसंचालन मोहन मिसाळ यांनी तर आभार प्रदर्शन पवार सर यांनी केले. यावेळी जाधव सर, नलवडे सर, अनिल जाधव, विजयसिंह मिसाळ, भारत गुरव उपस्थित होते.

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१