मगरवाडी येथील सभेत विठ्ठल परिवाराचे यंगब्रिग्रेड भगिरथ भालके भीमा परिवाच्या प्रचार सभेत उपस्थित.
मोहोळ तालुक्यातील भीमा सह साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विरोधकांकडून खालच्या पातळीवर जाऊन टिका करताना दिसत आहे .
२४’ मराठी न्यूज मोहोळ तालुका प्रतिनिधी – राजेश शिंदे .
भीमा सह साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात मगरवाडी येथील प्रचार सभेत विठ्ठल सह साखर कारखान्यांचे मा. चेअरमन भगिरथ भालके हे आज मगरवाडी येथील प्रचार सभेत उपस्थित राहीले आणि दोन गटातील चर्चेला आज पुर्ण विराम मिळाला आहे . विठ्ठल सह साखर कारखान्याच्या निवडणुकीत मुन्नासाहेब महाडिक हे येऊ शकेल नाहीत कारण ते दिल्लीत होते परंतु धनंजय महाडिक हे विठ्ठल च्या प्रचाराला आले नाहीत पण त्यांचा आशिर्वाद आपणाला होता.कै. भारत नाना भालके यांच्या निधनानंतर धनंजय महाडिक हे आमच्या परिवाराच्या मागे उभे राहिले
गेले अनेक दिवस सोशल मीडिया,फेसबुक, वाॅटसफ च्या माध्यमातून अनेक गैरसमज पसरल्याचे दिसून आले. विठ्ठल च्या निवडणुकीत विरोधकांकडून अपप्रचार करण्यात आला. कै. भारत नाना व खा. धनंजय महाडिक आमच्या पिढ्यान पिढ्या संबध आलेला आहे.आमच्यात कधी दुरावा अंतर पडणार नाही हे सांगण्यासाठीच आज मी या सभेच्या ठिकाणी उपस्थित आहे.साहेब विठ्ठल च्या प्रचार वेळी आले नसले तरी त्यांनी कशामुळे उपस्थित नव्हतो ते वेळोवेळी सांगितले आहे माञ साहेबांचा कार्यकर्ता हा आपल्या बरोबर होता.येत्या काळात विरोधकांकडून अपप्रचार करण्यात येईल कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका येत्या काळात आपना सर्वांना खा. धनंजय महाडिक यांच्या पाठीमागे सर्वाना उभ राह्याचे आहे
भीमा परिवाराचे नेते खा. धनंजय महाडिक हे या परिवाराचे नेते आहेत कुणीही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये येत्या १३ तारखेला कपबशीत च्या चिञावर फुलीचा शिक्का मारून प्रचंड मताने निवडून आणायचे आहे .यावेळेस मगरवाडी व पंचक्रोशीतील सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक एम डी पवार सर यांनी केले.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७