मोहोळ तालुक्यातील दहशत आम्ही मोडीत काढून भीमा कारखान्या वरती तिसरी चिमणी मी स्वतः उभारणार विश्वराज महाडिक.
२४’मराठी न्यूज,मोहोळ तालुका प्रतिनिधी राजेश शिंदे .
मोहोळ तालुक्यातील जनतेमध्ये मोठी दहशत होती वेगवेगळ्या मार्गाने अडचणीत आणले जात होते ती दहशत मोडून काढण्याचे काम खा धनंजय महाडिक यांनी केले आहे विरोधक स्वतःच्या स्वार्थासाठी भीमा कारखाना खाजगी केला जाणार असल्याचा अफवा उठवत आहेत भिमा सहकारी होता आहे आणि सहकारी तत्त्वावरच चालणार असल्याची ग्वाही विश्वराज महाडिक यांनी दिली टाकळी शिकंदर येथील भीमा कारखान्याच्या निवडणुकीत भीमा शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात विश्वराज महाडिक यांनी कातेवडी ढोक बाभूळगाव सय्यद वरवडे नजीक पिंपरी या गावात ऊस उत्पादक सभासदांशी संवाद साधला ते पुढे म्हणाले बोलताना म्हणाले की गेल्या तीन वर्षात विरोधकांनी राज्यात आघाडी सरकारच्या काळात सत्तेचा दुरुपयोग करत राष्ट्रवादीने भीमा कारखान्याच्या कारभारात त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे विरोधकांनी भीमा कारखाना कसा बंद पडेल यासाठी प्रयत्न केले आणि अजूनही चालूच आहे मग अनेक अडचणीतून मराठवाड्यात भीमा सहकारी कारखान्याला वाचण्याचे काम खासदार महाडिक यांनी केले
स्वतःची जमीन गहाण ठेवून खासदार महाडिक यांनी संस्था चालवली विरोधकाच्या पॅनलमध्ये तिथून नाही त्यामुळे त्यांना सभासदांनी प्रचाराला आल्यावर विचारत नेमका कारखाना कोण चालवणार आहे सवाल ही त्यांनी उपस्थित केला यावेळी युवराज चौगुले भीमराव मुळे आम्ही शेख नितीन निळे आधी सहभाग लोक शक्ती परिवाराचे कार्यकर्ते असंख्य उपस्थित होते .
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७