शनिवारी १२नोव्हेंबर रोजी पुन्हा राष्ट्रीय लोक अदालत.

२४’ मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे
पंढरपूर : न्यायालयात वर्षानुवर्षे खटले प्रलंबित असल्याने नागरिकांचा वेळ व पैसा वाया जाऊ लागला. खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी विधी व सेवा समितीवतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणून शनिवार दि.१२ नोव्हेंबर रोजी पुन्हा राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांनी खटले दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.दिवसेन दिवस दिवाणी व फौजदारी खटल्यांची संख्या वाढत आहे. यामुळे खटले निकाली काढण्यासाठी वर्षानुवर्षे लागत आहेत. नागरिकांनी आपसात तडजोड केली तर खटले लवकर निकाली लागतील म्हणून विधी व सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यास चांगला प्रतिसाद मिळाला. दि.१३ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत ९ लाख २९ हजार ३६४ खटले तडजोडीने निकाली काढण्यात आले.खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी आता पुन्हा शनिवार दि. १२ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीने आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांनी खटले ठेवून ते तडजोडीने निकाली काढण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले आहे. पंढरपूर येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१
ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा
८२०८३०८७८७