कौतुकास्पद ! इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये चिमुकल्या वेदांशीच्या कलेची नोंद.
24 मराठी न्यूज पुणे प्रतिनिधी
बालपणात चिऊ-काऊच्या, परिकथेच्या गोष्टी ऐकत आणि भातुकलीचा खेळ खेळत प्रत्येक जण मोठा होतो. पण, याच वयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यकथा ऐकून त्यांचे पोवाडे गाणार्या वेदांशी भोसले हिने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये विक्रम नोंदविला आहे.सर्वांत लहान वयात पोवाडे गाण्याचा हा विक्रम तिच्या नावावर झाला आहे. अवघ्या 3 वर्षांची ही चिमुकली परदेशात राहून मराठी मातीतील संस्कार न विसरता छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा खड्या आवाजात गाते.वेदांशी ही मूळची पुण्यातील घोरपडे पेठेतील असून, सध्या ती तिच्या आई-वडिलांबरोबर डेन्मार्क येथील ओडेन्स या शहरात राहत आहे. ओडेन्स येथे झालेल्या भारतीय सांस्कृतिक कार्यक्रमात 3 मिनिटे आणि 58 सेकंदांत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्तुती पोवाडा तिने गायला. सर्वांत लहान वयात पोवाडा गाणारी मुलगी म्हणून इंडिया बुकने तिची नोंद घेतली आहे.आई प्रीती भोसले ही गृहिणी आहे आणि वडील संतोष भोसले हे शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. वेदांशी ही 2 वर्षांची असल्यापासून मराठी कविता, श्लोक, स्तोत्र, आरती म्हणते. पालक प्रीती भोसले म्हणाल्या की, मी वेदांशीला दररोज मराठी भक्तिगीते, भावगीते, श्लोक, गोष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे आणि कथा ऐकवत असे. तितकेच मन लावून वेदांशी या सगळ्या गोष्टी ऐकायची आणि त्यांचे अनुकरण करायचा प्रयत्न करायची. या गोष्टीचा परिणाम तिचे वय वाढत असताना खूप छान झाला आणि त्यामुळेच ती सगळे श्लोक, भावगीते व पोवडा आनंदाने म्हणते.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*