शैक्षणिक

I.C.M.S.कॉलेज मध्ये टीम वर्क स्कील अँड एंटर पर्सनल कम्युनिकेशन वर्क शॉप संपन्न.

श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित

24 मराठी न्यूज पंढरपूर/ प्रतिनिधी श्री संपत लवटे

पंढरपूर -आय.सी.एम.एस महाविद्यालय मध्ये टीम वर्क स्किल अँड पर्सन कम्युनिकेशन वर्कशॉप घेण्यात आले. स्किल कम्युनिकेशन ही अशी प्रक्रिया आहे जिच्या माध्यमातून आपण आपले विचार,भावना,समोरच्या व्यक्तीजवळ व्यक्त करत असतो. आणि आज जेवढे ही यशस्वी व्यक्ती आपणास दिसून येतात.त्यांच्या यशामागे त्यांच्या कम्युनिकेशन स्किल्स मध्ये खूप मोठा हात असलेला आपणास दिसून येतो. म्हणून आपल्याला देखील जीवनात खूप मोठा व्यक्ती बनायचा असेल, यशस्वी व्हायचे असेल तर आपण प्रत्येकाने आपल्या पर्सनॅलिटी सोबत कम्युनिकेशन स्किल मध्ये देखील इम्प्रूमेंट करणे गरजेचे आहे.आणि कम्युनिकेशन हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा पार्ट आहे. हे एक खूप महत्त्वाची सॉफ्ट स्किल आहे.जे आपल्या अंगी असणे गरजेचे आहे कम्युनिकेशन ही एक प्रोसेस तसेच स्किल आहे.ज्याद्वारे दोन व्यक्ती आपले विचार,भावना, कल्पना, एकमेकांसोबत शेअर करू शकतात,त्यांची देवाणघेवाण करू शकतात, एक्सचेंज करू शकतात, एकमेकांसमोर आपली मते मांडू शकतात. अशी माहिती या वर्कशॉप मध्ये लेट्स लर्न अँड ग्रो टूगेदरचे संचालक प्रा.घोडके यांनी माहिती दिली. हे वर्कशॉप यशस्वीरित्या संपन्न करून घेतल्याबद्दल महाविद्यालयाच्या कॅम्पस प्रमुख प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते प्रा.डी.एस. घोडके यांचा सत्कार करण्यात आला. या वर्कशॉपसाठी बीसीए व बी.एस्सी (ईसीएस) भाग २ व ३ मधील १५० हून अधिक विद्यार्थी सहभागी होते. तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.अशी माहिती विभाग प्रमुख मुकुंद चौगुले यांनी दिली. हे वर्कशॉप यशस्वीरित्या संपन्न करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे अध्यक्ष एच.एम बागल,उपाध्यक्ष बी.डी.रोंगे, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी अभिनंदन केले.

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!