मुलीच्या लग्नात वडिलांची अनोखी शक्कल; वऱ्हाड्यांना रोपट्यांचा आहेर.
24 मराठी न्यूज नेटवर्क
पूरंदर तालुक्यातील वाल्हे येथील शेतकरी वधुपित्याने आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळमुक्तीचा उपाय म्हणुन वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी एक आगळावेगळा उपक्रम राबवला.आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचं लग्न समारंभ अविस्मरणीय करण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या क्लुप्त्या आजमावतात वाल्हे येथील तेजस्वी मनोज भुजबळ हिचा मुंढवा येथील ऋषभ विजय कोद्रे या शेतकरी नवदांपत्याचा आगळावेगळा विवाहसोहळा हडपसर येथे थाटामाटात पार पडला वाल्हे येथील मनोज भुजबळ आणि मंजुषा भुजबळ या शेतकरी दांमपत्याने वृक्षतोडीमुळे पडलेल्या दुष्काळाचे चित्र नजरेसमोर ठेऊन आपली मुलगी तेजस्वीच्या लग्न समारंभामध्ये वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाचे संदेश देण्यासाठी अनोखा उपक्रम राबवला लग्न मांडपात ठिकठिकाणी वृक्षारोपणाचे महत्व विशद करणारे अनेक फलक लावले वरात विवाहस्थळी येताच लग्न मंडपात प्रवेश करण्यापुर्वी नवरदेव व नववधुच्या हस्ते मांडवाबाहेरच वृक्षारोपण करण्यात आले विविध वृक्षांच्या रोपट्यांचा हटके आहेर लग्नात आलेल्या पाहुणे मंडळींना एक आठवण म्हणून भेट दिली वऱ्हाडीमंडळींना आंबा, चिंच, वड, गुलाब, सिताफळ आदी झाडांचे वाटप करण्यात आले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७*