दुधाचे दर पूर्ववत करण्याची सर्व संघटनांची मागणी पंढरपुरात शेतकरी आक्रमक
24 मराठी न्यूज नेटवर्क
पंढरपूर, . उपरी येथील पंढरपूर-सातारा महामार्गावर उपरीत येथे दूध दर वाढीसाठी सर्व शेतकरी संघटना, दूध उत्पादक शेतकरी व राजकीय पक्ष यांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. कमी केलेले दुधाचे दर पुर्ववत करा, अन्यथा (दि. २५) मे पासून जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष दिपक भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटिल, शेतकरी नेते समाधान फाटे यांनी पालकमंत्री व राज्याचे दूग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिला. यावेळी दूधाचे दर खासगी दूध संघाचे चेअरमन सोनाई व नेचर यांनी जाणूनबुजून दूधाचे दर कमी केले आहेत. आम्ही त्यांना सुध्दा इशारा दिला आहे, तुम्ही दुधाचे दर पुर्ववत करा अन्यथा (दि.२५) मे पासून तुमचे दुधाचे टँकर फिरू देणार नाही. कोरोनाच्या महामारीने व निसर्गाच्या अवकृपेनेसर्व शेतकरी उद्धवस्त झाला आहे, जर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे नाही राहिले तर आत्महत्या शिवाय पर्याय राहिलेला नाही
*दूध दर वाढीचा निर्णय लवकर घ्यावा *
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरणाऱ्या ऊस जावून चार पाच महिने झाले कांही कारखान्यांना बिल दिली नाहीत, दुधाचे पैसे दहा दिवसाला येतात, त्यामुळे दूध धंदा तोट्यात असताना सुध्दा शेतकरी दूध व्यवसाय करत आहे. नोकरी • मिळत नाही म्हणून शेतीला जोड धंदा म्हणून मुल दूध व्यवसाय करत आहेत. तरी सरकारने लवकरात लवकर बैठक घेऊन दूध दर वाढीचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी दिपक भोसले, समाधान फाटे, सचिन पाटील, अरूण आसबे, रणजित बागल, छगन पवार, बाळासाहेब बोबडे, सचिन आटकळे, विश्रांती भुसनर, निवास नागणे, साहेबराव नागणे, शहाजी जगदाळे, उपरीत गावचे सर्व दूध उत्पादक शेतकरी ग्रामस्थ सर्व शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com