मा.आ दत्तात्रय सावंत सर यांच्या पाठपुराव्यास यश
पंढरपूर प्रतिनिधी
उजनी उजवा कालवा वितरिका क्रमांक 32 मायनर 9,10 कोंढारकी – मुंढेवाडी या हद्दीतील कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला व झाडेझुडपे वाढलेली होती तसेच रस्त्याच्या दुतर्फा देखील मोठ्या प्रमाणात झाडे वाढलेली होती त्यामुळे नागरिकांना वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला होता. या संदर्भात मा.कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग पंढरपूर यांस पत्रव्यवहार केला असता याची दखल घेत आज दिनांक 10 डिसेंबर 23 रोजी का गाळ काढण्याचे व कालव्यामधील झाडे तसेच रस्त्याच्या दुतर्फा साईटची झाडे काढण्यास सुरुवात करण्यात आली.यामुळे पाणी वाहने करिता येणारा अडथळा दूर होणार आहे व कालवा देखील स्वच्छ होणार आहे. सदरच्या कामास भीमा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हरसुरे साहेब,उपअभियंता सौ.इंगोले मॅडम, सोमनाथ देशमुख यांचे सहकार्य लाभले.सदरच्या कामाचे उद्घाटन आमदार दत्तात्रय सावंत सर नागरी पतसंस्थेचे चेअरमन मा.श्री.अपूर्व दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कोंढारकी ग्रामपंचायत सदस्य अतुल पाटील,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र फुगारे,राम पाटील,ग्रामपंचायत उपसरपंच अनिल दांडगे, हणमंत पाटील,प्रताप दांडगे, भूषण माने, रामभाऊ कोळेकर, दगडू शेठ घोडके,कृष्णा लाटे, मुंढेवाडीचे रविंद्र मोरे सर,विकास भोसले,दीपक माने,दादा घोलप व गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com