आय.सी.एम.एस.महाविद्यालय मध्ये एच.आय.व्ही मुक्त समाज शिबिर संपन्न
पंढरपूर तालुका प्रतिनिधी श्री संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित,इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट स्टडीज कासेगाव येथे एच आय व्ही मुक्त समाज शिबिर संपन्न झाले शिबिराची सुरुवात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन पालवी संस्थेच्या सचिव डिंपल घाडगे मॅडम यांच्या हस्ते करून झाले. डिंपल घाडगे मॅडम यांचा सत्कार महाविद्यालयाच्या कॅम्पस प्रमुख डॉ.जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी घाडगे मॅडम बोलताना म्हणाले की एच आय व्ही मुक्त समाज करायचा असेल तर युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी नैतिक मूल्यांची रुजवणूक गरजेची आहे. एच आय व्ही हे विषाणूचे संक्रमण असते तर अनेक रोगांची अवस्था असते. एच आय व्ही एड्स चा विषाणू एकदा शरीरात गेला की, तू आयुष्यभर शरीरात राहतो हा एक असाध्य रोग असून या रोगाच्या निर्मूलनासाठी अजून कोणतीही लस विकसित झाली नाही. प्रतिबंध आणि माहितीची देवाण-घेवाण एवढेच उपाय आहेत. शासनाने उपलब्ध करून दिलेले आहे ए.आर.टी औषध उपचाराने रुग्ण सामान्य व्यक्ती प्रमाणेआयुष्य जगू शकतो या रुग्णांना समाजात सहानुभूतीची वागणूक मिळाली पाहिजे. कारण त्यांना सन्माननीय जगण्याचा अधिकार आहे. याबाबत युवकांनी जनजागृती करणे गरजेचे आहे. या शिबिरामध्ये या रोगाची लक्षणे तसेच या रोगावर प्रतिबंधक उपाय इत्यादी ची देखील माहिती दिली. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे शंकांचे समाधान करण्यात आले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्राध्यापिका सुप्रिया पाटील यांनी केले हे शिबिर संपन्न करून घेण्यासाठी प्राध्यापिका राजश्री भंडारी,शामाल निकम, कांचन नलावडे,यांनी परिश्रम घेतले शिबिर संपन्न करून घेतल्याबद्दल संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष एच.एम.बागल,उपाध्यक्ष बी. डी.रोंगे.खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*