मंद्रूपच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर नसल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन
(दक्षिण सोलापूर प्रतिनिधी शिवराज मुगळे)
दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणाऱ्या येथील मंद्रूप येथीलश्रेणी क्रमांक एक दर्जा असलेल्या पशुवैद्य दवाखान्यात गेल्या सहा महिन्यांपासून डॉक्टर नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत दवाखान्यासमोर आंदोलन केले.येत्या चार दिवसाच्या आत येथे डॉक्टरची नियुक्ती नाही झाल्यास पशुवैद्य दवाखान्यास टाळे ठोकून रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त शेतक-यांनी दिला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये पशुधन विकास अधिका-यांचे एक तसेच दोन शिपाई यांची पदे सहा महिन्यांपासून रिक्त आहेत. येथील पशुधन विकास अधिकारीचे पद रिक्त असल्याने येथे विविध पशुधनावर उपचार होत नसल्याने पशुधनाचे हाल होत आहेत. यावेळी शेतकरी कुमठाळे म्हणाले, येथे डॉक्टर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या हाल होत आहेत शेतकऱ्यांना नाईलाजाने खासगी डॉक्टर कडे जाऊन आपल्या पशुधनाचे उपचार करून घ्यावे लागत आहे. सध्या सहा महिन्यांपासून आमच्या पशुधन विविध आजारातून जात आहेत. आम्ही उपचारासाठी येथे आल्यावर येथे कोणीच हजर नसते.येथे वर्णोपचारक व सफाईदार पशूवर उपचार करतात हे धोकादायक आहे. सध्या हत्तूर येथील पशुधन विविध विकास अधिकारी दोन दिवसाआड येतात असे सांगितले जाते आम्हाला ते कधी दिसले नाहीत. येथे औषधाचा साठा संपल्याचे सांगितले जाते, दर महिन्यांला किती औषधाचा साठा येतो,कोणते औषधे संपले हेही लिहिले जात नाही. केस पेपरसाठी जास्त पैसे मागितले जाते.येथे सावळागोंधळ,अंदाधुद कारभार आहे. येथे कंत्राटदार पध्दतीने एक डॉक्टर नेमल्याचे सांगितले जाते तेही येथे उपलब्ध नसतात. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिकअडचणीत आहे त्यामुळे त्यांना खासगी डॉक्टराकडे उपचार करून घेताना अनेक समस्या येत आहेत त्यामुळे उपचाराभावी पशुधन दगावत आहेत. येत्या चार दिवसांमध्ये येथे सर्व पदाची नियुक्ती नाही झाल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यास टाळे ठोकण्यात येईल आणि रस्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी शेतकरी गोटू बोराळे, मळसिध्द पुजारी, सोमनाथ देशमुख, शिवशंकर देशमुख,गुरूसिद्ध कुमठाळे, शिवशंकर पुजारी, ओंकार देशमुख,अमोगसिद्ध टेळे, औदुसिद्ध पुजारी, लिंबण्णा शिंगडगाव, संजय चव्हाण, नितीन खरात, बबलू कुमठाळे, बिरू व्हनमाने,आप्पासाहेब साठे, सोमनिंग शिंगडगाव, चम्मा लिगेवान,अभिषेक चव्हाण, शुभम व्हनमाने, किरण दोडके, मळसिध्द केशवे,बापू साठे, अभिषेक साठे,श्रीशैल हंजगे कलाप्पा घाले आदी उपस्थित होते.
🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com