आय.सी.एम.एस.महाविद्यालयामध्ये पारंपारिक वेशभूषेतून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन
पंढरपूर तालुका प्रतिनिधी श्री संपत लवटे
आय.सी.एम.एस.महाविद्यालयामध्ये पारंपारिक वेशभूषेतून घडले भारतीय संस्कृतीचे दर्शन.श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर मॅनेजमेंट कासेगाव, येथे पारंपारिक वेशभूषा दिन संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन कॅम्पस प्रमुख डॉ. जयश्री भोसले यांच्या हस्ते करण्यात आले
विविधरंगी पोशाख परिधान करून महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संस्कृतीचा अनोखा मिलाप साधला मराठी,गुजराती,बंगाली,मारवाडी दक्षिणात्य, काश्मिरी,आदी संस्कृतीचे दर्शन घडवणारे वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले. मुले फेटा,कुर्ता, परिधान करून वावरत होती,तर मुली नऊवारी साडीत वावरत होत्या तर काही विद्यार्थ्यांनी वारकऱ्याचा सुद्धा पोशाख परिधान करून विविध धार्मिक,ऐतिहासिक, पौराणिक वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचा आनंद लुटला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे संस्थापक सचिव,डॉ.बी.पी.रोंगे. अध्यक्ष एच.एम.बागल.उपाध्यक्ष बी.डी.रोंगे. खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.