दक्षिण सोलापूर (प्रतिनिधी) शिवराज मुगळे
सध्या राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपाला तब्बल दीड महिना होऊन गेला तरी अद्याप या संपावर कुठलाच तोडगा निघत नसल्याने चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उलट आंदोलनांची धग अंगणवाडी सेविकांनी कमी होऊ दिली नाही. राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस संपावर असून एकंदरीत तोडगा निघत नसल्याने चिमुकल्यांची अंगणवाडी कुलूप बंद असल्याचे चित्र मंद्रूपसह ग्रामीण भागात पहावयास मिळत आहेत. गेल्या डिसेंबर महिन्याच्या चार तारखेपासून अंगणवाडी सेविका व मदतीनीस यांचे काम बंद आंदोलन सुरू असून त्यामुळे पोषण आहारासह विविध कामे खोळंबली आहेत. या संपामध्ये विविध संघटना सहभागी झाल्या असून शासन स्तरावर कोणताच तोडगा निघेना तर संपाची धग अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी कायम ठेवली आहे आपल्या चिमुकल्यांच्या पोषण आहारासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा जीव कासाविस होत असला तरी मात्र शासनाला काही जाग येत नसल्याने मागण्या मान्य होईपर्यंत संप कायम राहणार आहे असण्यावर अंगणवाडी सेविका व मदतनीस ठाम आहेत मानधनात वाढ करणे, निवृत्ती वेतन दर महिना देणे, नवीन मोबाईल देणे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे आधि अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मागण्या आहेत. सेविका व मदतनीस यांना अंगणवाडी मध्ये मुलांचा पोषण आहार देणे, त्यांचे वजन घेणे, गर्भवती महिला तसेच स्तनदा मातांना पोषण आहार पुरविणे इत्यादी कामे ठप्प झाले असून मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे दिसत आहे .
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*