स्व. वसंतराव (दादा) काळे यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त् मोफत सर्वरोगनिदान व औषधोपचार शिबिर संपन्न.
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
पंढरीच्या आरोग्य क्षेत्रात भरीव कार्य करुन शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांना उत्तम सुविधा देण्याबरोबर आधार देण्याचे काम जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून होत असल्याचे मत श्री .विठठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके यांनी व्यक्त केले. सदर शिबीरात एकुण 1120 रुग्णांना तपासून मोफत औषधोपचार करण्यता आला सहकार शिरोमणी स्व्. वसंतराव (दादा) काळे यांच्या 80 व्या जयंतीनिमित्त् चेअरमन कल्याणराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतदादा काळे मेडिकल फाउंडेशन संचलित जनकल्याण हॉस्पीटल, यांचे वतीने मोफत सर्वरोग निदान शिबीर व औषधोपचार शिबीराचे उद्घाटन प्रसंगी भगिरथ भालके बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री विठठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक युवराज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर वैद्यकिय अधिक्षक डॉ.महेश सुडके, सिनिअर फिजीशिअन डॉ.संग्राम गायकवाड, नि.मा.संघटनेचे अध्यक्ष डॉ.अमरसिंह जमदाडे, सिताराम महाराज साखर कारखान्याचे संचालक महादेव देठे, सहकार शिरोमणीचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, संचालक मोहन नागटिळक, जयसिंह देशमुख, उपस्थित होते.विठठल हॉस्पिटलचे अध्यक्ष युवराज पाटील म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून जनकल्याण हॉस्पिटल रुग्णांना चांगली सेवा सुविध देत असल्याचे सांगितले.सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 80 व्या जयंती निमित्त मोफत सर्वरोग निदान व औषधोपचार शिबीर जनकल्याण हॉस्पिटलच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यामध्ये नेत्ररोग, मेंद् व मणक्याचे विकार, अस्थीरोग, बालरोग, पोटाचे विकार, स्त्रीरोग, मधुमेह निदान व उपचार या सर्व आजारावर शिीबरात 1120 रुग्णांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. यामध्ये नेत्र रोग तपासणी करुन 380 रुगणांना लगेच मोफत चष्मे वाटप करण्यात आले. सदर रुग्णांवर तज्ञ डॉ.मनोज भायगुडे, डॉ.सौ.मोनिका परदेशी, डॉ.आनंद कुलकर्णी, डॉ.सौ.रसिका कुलकर्णी, डॉ.ओजस देवकते, डॉ.नीरज शहा, डॉ.सौ.वर्षा पाटील, डॉ.अरविंद गिराम, डॉ.संजय पाटील, डॉ.सुजित जाधव, डॉ.अजित जाधव, डॉ.सौ.सिमा इंगोले-पाटील, डॉ.सौ.संगिता पाटील, डॉ.पंढरीनाथ घोगले, डॉ.निलेश स्वामी, डॉ.विलास गुळमकर,डॉ.संजय बागल, डॉ.लक्ष्मण किलमिसे,डॉ.भारत म्हेत्रे, डॉ.प्रल्हाद मोहोळकर, डॉ.शितल पाटील, डॉ.सौ.जयश्री शिनगारे, डॉ.अमृता म्हेत्रे, डॉ.अनिल काळे, डॉ.अजित काळे, डॉ.विजय मुढे, डॉ.शुभम शिनगारे, डॉ.सोनाली माने, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सौ. विद्या कुचेकर, प्राचार्य अविनाश गवळी, त्यांचे सर्व सहकारी, नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थींनी / विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक वसंतदादा काळे मेडीकल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, डॉ.सुधीर शिनगारे यांनी करुन दादांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच जनकल्याण हॉस्पिटलच्या उभारणी पासून दरवर्षी शिबीर आयोजित करुन सामाजिक बांधीलकी जोपासत आहे. पंढरपूर मधील सर्व तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानूसार व सहकार्याने हॉस्पिटल मध्ये गोरगरीब रुग्णांवर अल्प दरात चांगली सुविधा देण्याचे काम सुरुच असून शासनाच्या योजनेची अंमलबजावणी करुन रुग्णांना आधार देण्याचे काम सुरु असल्याचे डॉ.शिनगारे यांनी सांगीतले.गणेश पाटील यांनी आपले मनोगतात जनकल्याण हॉस्पिटलच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांवर चांगल्या पध्दतीने उपचार होत असलेबाबत समाधान व्यक्त केले. डॉ.संगिता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी जनकल्याण हॉस्पिटलच्या आरोग्य क्षेत्रातील विविध प्रकारच्या उपक्रमांचे कौतूक केले. कोरोना काळात हॉस्पिटलने गरीब रुग्णांना चांगली सेवा दिल्याचे सांगीतले. स्व.वसंतदादा काळे यांच्या अंगीकारलेला सामाजिक कार्याचा वारसा आम्ही जनसेवेच्या माध्यमातून पुढे नेत असल्याचे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन संजय कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे आभार अनिल काळे यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जनकल्याण हॉस्पिटलच्या सर्व विभागातील डॉक्टर व स्टाफ यांनी सहकार्य केले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*