गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत व सेवा मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्ष संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित.
मोहोळ प्रतिनिधी
गरजू रुग्णांनी या कक्षाशी संपर्क करुन लाभ घेण्याचे राज्य प्रमुख जितेंद्र सातव यांचे आवाहन
मोहोळ ( प्रतिनिधी ) :
ग्रामीण व शहरी भागातील गरजू रुग्णांना राष्ट्रवादी काँग्रेस वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आरोग्य व आर्थिक नियोजन करिता शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना याचा लाभ मिळवून देण्यासाठी हा वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्रभर कार्यान्वित आहे या कक्षा माध्यमातून संपूर्ण सामाजिक दायित्व म्हणून काम केले जात आहे त्यामुळे नागरिक रुग्ण व त्याचे नातेवाईक यांनी कक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रमुख जितेंद्र सातव यांनी यांनी केले.* श्री. सातव व सहकारी बारामती येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी संवाद, संघटन बांधणी व संवाद दौरा निमित्ताने आले होते त्याप्रसंगी बोलत होते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांचे स्विय्य सहाय्यक श्री. सुनिल मुसळे सर यांची वैद्यकीय क्षेत्रातील भविष्यातील उत्कृष्ठ कार्याविषयी नियोजनात्मक बैठक ही यावेळी पार पडली यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी वैद्यकीय मदत कक्षाचे राज्य विस्तारक सुनिल गोरे, पश्चिम महाराष्ट्र सह समन्वयक सचिन सरवदे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून पुढील संघनात्मक बांधणी व कार्याविषयी मार्गदर्शन केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष खा. सुनिलजी तटकरे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल्लभाई पटेल साहेब, महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोग अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस वैद्यकीय मदत कक्ष माध्यमातून जास्तीत जास्त गरजू रुग्णांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून व वैद्यकीय क्षेत्रात सकारात्मक बदल घडवण्याच्या उद्देशाने कक्ष कार्यान्वित व सक्रिय आहे असे ही सुनिल गोरे यांनी स्पष्ट केले. लवकरच पश्चीम महाराष्ट्रातील जिल्हा व प्रत्येक तालुका निहाय दौऱ्यांचे नियोजन करण्यात आल्यांचे माहिती पश्चिम महाराष्ट्र समन्वयक सचिन सरवदे यांनी सांगितले. याप्रसंगी पुणे जिल्हा समन्वयक दत्ता भगत, जिल्हा सह समन्वयक विकास भंडलकर व स्थानिक पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.