संविधान हे फक्त एक पुस्तक नसून प्रत्येक भारतीयांचा जीवन जगण्याचा मार्ग आहे :-आमिर काझी
मोहोळ प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून युवा जागृती मंचच्या वतीने मोहोळ येथे एक दिवशीय संविधान कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून संविधान प्रचार समितीचे अमीर काझी होते.
या कार्यशाळेचे उद्घाटन नंदकुमार नाना फाटे यांच्या हस्ते झाले .या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून नागनाथ कॉलेजचे उपप्राचार्य पी एस शिंदे सर, डॉ. प्रसाद पावले, अनिंसचे काशीद सर, मराठा सेवा संघाचे पांडुरंग तात्या शिंदे, प्रा.अशोक पाचकुडवे, धर्मराज चवरे सर, ज्येष्ठ पत्रकार संजय आठवले आदी मान्यवर होते. या संविधान कार्यशाळेस मोहोळ तालुक्यातील विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. या कार्यशाळेमध्ये संविधानाची निर्मिती संविधानातील मूल्ये, संविधानाबाबतचे समज व गैरसमज तसेच भारत कसा असावा व कसा घडवावा, याबाबत सविस्तर चर्चा व उदाहरणासहित स्पष्टीकरण दिले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय लोंढे, भैय्यासाहेब कांबळे, आनंद अवचारे, सागर रोकडे आदि परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.आकाश कापुरे यानी केले तर आभार हरिभाऊ सरवदे यांनी मानले.