द.ह.कवठेकर प्रशालेत स्वरतरंग आणि कलाविष्कार संपन्न
पंढरपूर तालुका प्रतिनिधी
पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर, द.ह.कवठेकर प्रशाला, अध्यापक विद्यालय, आदर्श बाल व प्राथमिक मंदिर, पंचरत्न इंग्लिश मीडिया स्कुल या सर्व शाखांचा एकत्रित समूहगान कार्यक्रम व सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांचे चित्रकला प्रदर्शन संपन्न झाले
या कार्यक्रमास प्रमुख अभ्यागत म्हणून महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, उच्च न्यायलयाचे वकील श्रीनिवास पटवर्धन, शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, गट शिक्षणाधिकारी मारुती लिगाडे, स्वेरीचे प्राचार्य बी.पी.रोंगे संस्थेचे अध्यक्ष नानामालक कवठेकर, सचिव सु.र.पटवर्धन, पदाधिकारी डॉ.अनिल जोशी, एस.पी.कुलकर्णी, संजय कुलकर्णी, श्री.पाठक सेवानिवृत्त शिक्षिका वै.सु.पटवर्धन मॅडम,मो.प्र.पाठक, शाहू सतपाल, दिपाली सतपाल,मंदार लोहोकरे सर्व शाखांचे प्रमुख व्ही.एम.कुलकर्णी, व्ही.वाय.पाटील,डॉ.एच.आर.वाघमारे, एम.डी.सांगोलकर, एच.डी.मोहोळकर पालक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या बालचित्रकारांनी चितारलेल्या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन स्व. विजेंद्र जोशी कलादालनात प्रमुख अभ्यागत सूरज मांढरे साहेब व श्रीनिवास पटवर्धन यांनी केले. स्वरतरंग कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्ती, राष्ट्रप्रेम, पर्यावरण राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव या विषयावरील दहा गाणी उत्तम आवाजात सादर केली.
या कार्यक्रमात संस्थेच्या सर्व शाखेतील 4000 विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे मानद सचिव श्री सु.र. पटवर्धन सर यांनी केले. मुख्याध्यापक श्री.व्ही.एम. कुलकर्णी यांनी परिचय केला. आभार मुख्याध्यापक व्ही.वाय. पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे निवेदन एस. एम. कुलकर्णी यांनी केले. यावेळी बोलताना प्रमुख अध्यागत महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी आपल्या विद्यार्थीदशेतील आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्याने सदैव मेहनत, परिश्रम व अभ्यास चिकाटीने केला पाहिजे तरच त्यांचा भविष्यकाळ उज्वल होईल असे सांगून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष नानामालक कवठेकर यांच्या हस्ते प्रमुख अभ्यागत सूरज मांढरे व श्रीनिवास पटवर्धन यांचा सत्कार संपन्न झाला.स्वरतरंग हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीत शिक्षक श्री विनोद शेंडगे श्री राजेश खिस्ते उमेश केसकर श्री. देशपांडे यांनी विशेष परिश्रम घेतले. चित्रकला प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी कलाशिक्षक अमित वाडेकर रमेश देवमारे एन.आर.कांबळे, पूनम दळवी यांनी परिश्रम घेतले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*