दि. २३ ते २६ फेब्रुवारी अखेर भारत कृषी महोत्सवाचे रेल्वे ग्राउंड येथे आयोजन
शेतकरी मेळाव्यास येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आरोग्य मंत्री तानाजी सावंत.
पंढरपूर (प्रतिनिधी) –
स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त लोकनेते आमदार भारत नाना भालके फाऊंडेशन व साईश्री ॲग्रो फार्मर्स प्रोडयुसर कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने भारत कृषी महोत्सवाचे पंढरपुर रेल्वे ग्राउंड येथे दिनांक २३ ते२६ फेब्रुवारी २०२४ अखेर आयोजन करण्यात आले आहे.
आज सकाळी रेल्वे ग्राउंड पंढरपूर येथे कार्यस्थळावर भव्य असा शामियाना उभारला जाणार आहे त्याचे भुमिपुजन समयी पत्रकारांशी बोलताना भगिरथ भालके म्हणाले की, सदर कार्यक्रमासाठी व शेतकरी मेळाव्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना निमंत्रित केले आहे अशी माहिती त्यांनी दिली. सोमवार आज रेल्वे मैदान येथे उभारण्यात येणाऱ्या भव्य आशा शामियाण्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेचयावेळी माजी नगराध्यक्ष सुधीर धोत्रे, नगरसेवक महादेव धोत्रे, नगरसेवक लखन चौगुले, माजी नगरसेवक महम्मद वस्ताद,संजय बंदपट्टे, सतीश शिंदे, राहुल साबळे, मुन्ना मलपे, दत्ता भोसले यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे राज्यस्तरीय कृषी, दुध डेअरी व पशुपक्षी प्रदर्शन या भारत कृषी महोत्सव २०२४ चे आयोजन केले असून या महोत्सवामध्ये पशु,पक्षी संवर्धनासाठी तसेच शेती विषयक विविध प्रकारचे अत्याधुनिक उपकरणांची माहिती तसेच तज्ञ मान्यवर मंडळी यांच्याकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. हे प्रदर्शन रेल्वे ग्राउंड या ठिकाणी होणार असून या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील तसेच अन्य जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक तसेच पशुधनाच्या बाबतीत सखोल अशी माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे. त्याचा लाभ संपूर्ण आपल्या तालुक्यातील तसेच जिल्हा व राज्यातील शेतकरी बांधवांना होणार आहे.
सदर कृषी महोत्सवात शेतकरी महिला माता- भगिनींसाठी खास असे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या महिलांच्या कार्यक्रमांमध्ये खेळ पैठणीचा, हळदी-कुंकू या कार्यक्रमासोबतच मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमाचे देखील आयोजन केलेले आहे. तसेच त्यांना शेती विषयी विविध माहिती देखील देण्यात येणार आहे. याचबरोबर श्वानप्रेमी बांधवांना या कृषी प्रदर्शनामध्ये डॉग शो व कॅट शोचे आयोजन केलेले आहे.याप्रसंगी या कृषी महोत्सवात देश विदेशातील कृषी तज्ञ, शेतकरी, व्यापारी, विविध शेती विषयक अवजारे बनविणारे, औषधे निर्मिते कंपनी, पशुखाद्य तसेच नवनवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्या विविध प्रकारचे शेती विषयक स्टाॅल असणार आहेत.अशी माहिती आयोजक समितीच्या वतीने देण्यात आली.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*