सामाजिक

१५ मे रोजी महावितरणतर्फे ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन :- ग्राहक पंचायत

पंढरपूर प्रतिनिधी

पंढरपूर – महावितरणतर्फे *जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये दि.१५ मे रोजी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले* असल्याची माहिती अ. भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली वीज ग्राहकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी निवारण्यासाठी *महावितरणतर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्याची तरतूद* आहे. त्याप्रमाणे मे मधील ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन दि.१५ मे रोजी जिल्ह्यातील पंढरपूर, बार्शी,अकलूज, सोलापूर शहर व ग्रामीण येथील विभागीय कार्यालयांमध्ये सकाळी १०ते दुपारी १ वा.पर्यंत करण्यात आले आहे. तरी वरीलप्रमाणे कार्यकारी अभियंता, महावितरण यांचे कार्यालयात उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडून, त्यांची सोडवणूक करून घ्यावी. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता,उप कार्यकारी अभियंता, सहा.अभियंता हे अधिकारी समक्ष उपस्थित राहून तक्रारी,अडचणी,सोडविणार आहेत.तरी *पंढरपूर, बार्शी,अकलूज,सोलापूर ग्रामीण,सोलापूर शहर* या ठिकाणी सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांनी आपल्या अवाजवी बील,सरासरी बील आकारणी, वीज बिल वेळेत न मिळणे,मीटर रीडिंग वेळेत न घेणे, कनेक्शन वेळेत न मिळणे, योग्य दाबाने वीजपुरवठा न होणे, वारंवार वीजपुरवठा खंडित होणे,नविन मीटर वेळेत न मिळाल्यामुळे ग्राहकांना स्वखर्चाने आणलेल्या मीटरची संपूर्ण रक्कम न मिळणे, शेतकरी ग्राहकांना वेळेत डी. पी.बदलून न मिळणे अशा कोणत्याही स्वरुपातील लिखित तक्रार अर्जासह उपस्थित राहावे असे आवाहन अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक दीपक इरकल,प्रांत कोषाध्यक्ष विनोद भरते,सदस्य सुभाष सरदेशमुख, जिल्हा सचिव सुहास निकते,पंढरपूर तालुकाध्यक्ष विनय उपाध्ये,संघटक महेश भोसले, उपाध्यक्ष नंदकुमार देशपांडे,सचिव प्रा.धनंजय पंधे, अण्णा ऐतवाडकर, पांडुरंग अल्लापूरकर यांनी केले आहे.

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!