लोटस इंग्लिश स्कूलचा सी.बी.एस.ई.चा निकाल १०० टक्के
पंढरपूर प्रतिनिधी संपत लवटे
श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूल कासेगावच्या सी.बी.एस.ई च्या मार्च २०२३-२४या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.त्यामध्ये इयत्ता १०वी च्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण अनुक्रमे खालील प्रमाणे.नेहा डुबल ९६.५०% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर सृष्टी रोंगे ९३.८०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तसेच विवेक लामकाने ९२.८०% गुण मिळवून तृतीया क्रमांक मिळवला याच बरोबर आदिती नागणे ९२.८०% साईनाथ लोखंडे ९२.८०% श्रेया घाडगे ९१.४०% सृष्टी नागणे ९१.२०% उमेश वगरे९१.२०% रिया बोडके ९१.२०% सायली गुंड ९०.४०%या सर्वांनी ९०%पेक्षा जास्त गुण मिळवण्याची किमया केली अशी माहिती शाळेच्या प्राचार्या डॉ.जयश्री भोसले यांनी दिली शाळेत घेण्यात आलेल्या प्रॅक्टिस सेशन,टेस्ट सिरीज अभ्यासक्रमाचे नियोजन,रिविजन, सराव परीक्षा,विद्यार्थी विकास कार्यक्रम,नाईट स्टडीचे नियोजन, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे तंतोतंत वेळापत्रक, शिस्त, आणि डॉ.बी.पी रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली राबविलेल्या पंढरपूर पॅटर्न सेकंडरी स्कूल एज्युकेशन आदी उपक्रमामुळे शाळेचा उत्कृष्ट निकाल लागला इयत्ता दहावीची ७वी बॅच असल्यामुळे ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व पालकांच्या मनात उत्सुकता होती.लोटस इंग्लिश स्कूल उत्कृष्टपणे प्रगतीच्या पथावर आहे.असे मत सर्वजण व्यक्त करत आहेत
यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी. रोंगे,आणि अध्यक्ष एच.एम.बागल. यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव.डॉ.बी.पी रोंगे.अध्यक्ष.बी.डी.रोंगे.उपाध्यक्ष एच.एम.बागल.खजिनदार दादासाहेब रोंगे तसेच स्कूलच्या प्राचार्या.डॉ.जयश्री भोसले,वर्गशिक्षक दयानंद जाधव,संतोष गाढवे,शिक्षक सचिन निकम,संपत लवटे,ज्ञानेश्वर वायदंडे, राजकुमार बंडगर,संतोष पवार, आशुतोष दुधाणे, शिक्षिका पूजा भोसले, प्रतिभा घोडके,जयश्री बेडगे.आदी शिक्षकांनी व पालकांनी अभिनंदन केले.
*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*