शैक्षणिक

वसंतराव काळे शैक्षणिक संकुल वाडीकुरोलीचा दहावीचा निकाल 97.92%

वाडीकुरोलीची वैष्णवी गुरव व आढीवची समीक्षा चव्हाण संस्थेत प्रथम

पंढरपूर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे बोर्ड यांच्या वतीने मार्च 2024 मध्ये झालेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा वसंतराव काळे शैक्षणिक संकुलाचा निकाल 97.92% लागला संस्थेच्या एकूण चार शाखेमधून दहावी परीक्षेसाठी 338 विद्यार्थी परीक्षेत बसले होते यापैकी 331 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोलीची विद्यार्थिनी वैष्णवी बंडू गुरव व भैरवनाथ विद्यालय आढीवची विद्यार्थिनी समीक्षा लक्ष्मण चव्हाण यांनी 94.20% इतके समान गुण मिळवत दोघींनी संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला. वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोलीची विद्यार्थिनी श्रावणी सिताराम काळे हिने 93 टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक व श्रीमंतराव काळे विद्यालय जैनवाडीची प्राप्ती राजेंद्र सावंत हिने 91.80% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.संस्थेतील भैरवनाथ विद्यालय व वसंतराव काळे कनिष्ठ महाविद्यालय आढीव व श्रीमंतराव काळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय जैनवाडी-धोंडेवाडी या शाखांचा निकाल 100टक्के लागला असून वसंतराव काळे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय वाडीकुरोली सेमी इंग्रजी माध्यमाचा निकाल 100 टक्के व मराठी माध्यमाचा निकाल 94.66टक्के तर मॉडर्न हायस्कूल पिराचीकुरोली शाखेचा निकाल 93.02टक्के लागला आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कल्याणराव काळे सचिव बाळासाहेब काळे गुरुजी सर्व संचालक मंडळ विविध शाखांचे शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ,सदस्य व शाखाप्रमुख यांनी अभिनंदन केले

*🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ☎️९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा🙏🏻☎️८२०८३०८७८७📧 lakhansalunkhe75@gmail.com*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!