"This news portal adheres to the Digital Media Ethics Code, 2021, established under the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, notified by the Ministry of Information and Broadcasting (MIB). Furthermore, it ensures compliance by submitting mandatory monthly reports to the government as stipulated.

सामाजिक

आजही सभासदांचा पंढरपूर अर्बन बँकेवर विश्वास कायम:आ. प्रशांत परिचारक.

२४ मराठी न्यूज पंढरपूर श्री नंदकुमार देशपांडे

पत्रकारांशी बोलताना प्रशांत परिचारक यांनी, शंभर वर्षाहून अधिक जुन्या असणार्‍या या बँकेचे जवळपास पन्नास हजार सभासद आहेत. बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शेकडो सभासदांनी आमच्यावर विश्‍वास असल्याचे वेळोवेळी भेटून सांगितले होते. बँक ही एक आर्थिक संस्था असून निवडणुकीचा आखाडा नाही पंढरपूर अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण ३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या विरोधात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी समविचारी आघाडी स्थापन करून याव्दारे सर्व सतरा जागेसाठी अठरा उमेदवारी अर्ज दाखल केले होते. बुधवारी छाननीची प्रक्रीया पूर्ण झाली व यावर आज गुरूवारी सकाळी निर्णय देण्यात आला. सहायक निबंधक कार्यालयात सकाळी अकरा वाजता वैध उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली. यामध्ये केवळ सत्ताधारी गटातील अठरा उमेदवारांची नावे होती. निवडणुकीच्या नियमानुसार आवश्यक असणारी प्रक्रीया विरोधी समविचारी आघाडीच्या उमेदवारांनी पूर्ण केली नसल्याने सदर अर्ज अवैध ठरविण्यात आले. यामध्ये उमेदवाराची पंढरपूर अर्बन बँकेत एक लाख रूपयाची ठेव असावी, तीस हजार रूपयाचे भागभांडवल असावे, उमेदवारासह सूचक अनुमोदक बँकेचे थकबाकीदार नसावेत आदी नियम आहेत. पुरेसे भागभांडवल नसल्याने बहुतांश उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद ठरविण्यात आले असल्याचे सहायक निबंधक दुरगुडे यांनी सांगितले.दरम्यान विरोधी गटाचे सर्वच अर्ज बाद ठरल्याची माहिती मिळताच पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक नेते प्रणव परिचारक यांच्यासह कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला

शहरातील सर्व महापुरूषांच्या पुतळ्यांना हार घालून अभिवादन करण्यात आले. तसेच ङ्गटाक्याच्या अतिषबाजीमध्ये व हालग्याच्या साथीने चौङ्गाळा ते महाव्दार चौक मार्गे परिचारक यांच्या वाड्या पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या ठिकाणी सर्व उमेदवारांचा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या सत्कार करण्यात आला. शहर व तालुक्यातील कार्यकर्त्यांनी गर्दी करून परिचारक यांचे अभिनंदन केले.निवडणुकीच्या प्रक्रीये नुसार दि.१२ जानेवारी पर्यंत उमेदवारी मागे घेण्याची मुदत असून सत्ताधारी गटातील एक उमेदवारी अर्ज मागे घेतला जाणार आहे. यानंतरच अधिकृतपणे बिनविरोध उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.यावेळी पत्रकारांशी बोलताना प्रशांत परिचारक यांनी, शंभर वर्षाहून अधिक जुन्या असणार्‍या या बँकेचे जवळपास पन्नास हजार सभासद आहेत.

बँकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर शेकडो सभासदांनी आमच्यावर विश्‍वास असल्याचे वेळोवेळी भेटून सांगितले होते. बँक ही एक आर्थिक संस्था असून निवडणुकीचा आखाडा नाही. यामुळे वित्तीय संस्थेवर आरोप करण्यापूर्वी विरोधकांनी हजारो ठेवीदार, कर्जदार यांचा विचार करणे गरजचे आहे असे मत व्यक्त केले. कोणत्याही तक्रारी असतील किंवा सूचना असतील तर आमच्याशी संपर्क साधावा त्या चर्चेने सोडवू. मात्र बिनबुडाचे आरोप करून संस्था बदनाम करू नका असे आवाहन केले. ही संस्था आणखी दोनशे, तीनशे वर्ष टिकली पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.वैध उमेदवारप्रशांत परिचारक, राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरिष ताठे, पांडुरंग घंटी, सतीश मुळे, मनोज सुरवसे, शांताराम कुलकर्णी, अनिल अभंगराव, ऋषिकेश उत्पात, विनायक हरिदास, अनंत कटप, अभिजीत मांगले, गणेश शिंगण, गजेंद्र माने, राजेंद्र कौलवार, माधुरी जोशी व डॉ.संगिता पाटील

🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔶🔷🔷ताज्या बातम्या, मनोरंजन, तसेच व्हायरल बातम्यांसाठी आमचा व्हॉट्स अॅप ग्रुप ला जॉईन करा🙏🏻८२०८३०८७८७

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
20:40