आर्थिक

शालेय आहारातील तांदूळ खासगी गोदामात

बचत गटाच्या तत्परतेमुळे ४०० क्विंटल साठा ताब्यात

24 मराठी न्यूज प्रतिनिधी नाशिक

:शालेय पोषण आहारात वापरला जाणारा निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा साठा पंचवटीतील गोदामात आढळल्याने खळबळ उडाली आहे. ४०० ते ५०० िक्वटल हा तांदूळ असल्याचा अंदाज आहे. मध्यवर्ती स्वयंपाकगृहालगतच हे गोदाम आहे. बचत गटाच्या सदस्यांनी हा तांदूळ पकडून दिला. पुरवठा विभागाने तो पोषण आहारातील असल्याचे नमूद केले. तर महापालिकेने पडताळणीअंती याची स्पष्टता होईल असे म्हटले आहे.

पंचवटीतील हिरावाडी परिसरात मध्यवर्ती स्वयंपाकगृह आहे. त्यालगतच्या गोदामात मोठय़ा प्रमाणात तांदूळ साठविल्याची माहिती बचत गट महासंघाला मिळाली होती. त्या आधारे बचत गटाच्या सरला चव्हाण, सुषमा पगारे यासह इतर महिलांनी यंत्रणेला कल्पना देत उपरोक्त ठिकाणी अकस्मात पाहणी केली. तिथे मोठय़ा प्रमाणात तांदूळ साठविलेला आढळला. त्याचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले.

मध्यवर्ती स्वयंपाकगृहाचा हा तांदूळ असल्याचे सांगितले जाते. अडीच वर्षांपूर्वीचा तो असल्याचे लक्षात आले. खराब झाला असल्याने तो गोदामात ठेवला गेल्याची माहिती महिलांना दिली गेली. खराब तांदूळ मिळाल्यास तो लगेच बदलून घेतला जातो. परंतु, तो अशा प्रकारे गोदामात ठेवण्याची गरज काय, असा प्रश्न बचत गटातील महिलांनी उपस्थित केला. पुरवठा विभागाच्या निरीक्षकांनी हा तांदूळ शालेय पोषण आहार योजनेतील असल्याचे सूचित केले. दीड, दोन वर्षांपूर्वी मध्यवर्ती स्वयंपाकगृहातून पोषण आहाराचे वाटप केले जात होते. त्यात या तांदळाचा वापर झाल्याची चर्चा आहे. पुढील काळात तो खराब झाला असावा. त्याचा कुठे वापर केला गेला, याबद्दल तर्कवितर्क व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती समजल्यानंतर शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी सुनिता धनकर यांनी संध्याकाळी उपरोक्त गोदामात भेट दिली. माध्यान्ह भोजन व्यवस्थेचे अधीक्षक नसल्याने हा तांदूळ कुणाचा आहे, याची स्पष्टता झाली नाही. गोदामात किती तांदूळ आहे याची मोजदाद करता आली नसल्याचे त्यांनी सांगितले. हा तांदूळ नेमका कुणाचा आहे, हे पोषण आहार विभागाला विचारले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. या बाबत पंचवटी पोलीस ठाण्यात संध्याकाळपर्यंत कुठलीही नोंद झालेली नव्हती

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!