कर्मवीर’ मधील भौतिकशास्त्र विभागास ‘यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांची अभ्यास भेट
यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांना माहिती देताना महाविद्यालयीन विद्यार्थ्यिनी, सोबत प्राचार्य डॉ दादासाहेब साळुंखे व उपप्राचार्य प्रोफे. डॉ. लतिका बागल
24 मराठी न्यूज मुख्य संपादक श्री लखन साळुंखे
पंढरपूर – विद्यार्थ्यांनी नेहमी वैज्ञानिक दृष्टीकोण ठेवावा. विद्यार्थ्यांनी सैद्धांतिक ज्ञानाचे उपयोजन करता आले पाहिजे. शालेय अभ्यासक्रमासोबत व्यावहारिक ज्ञान घेणेही आवश्यक आहे. विद्यार्थ्यामध्ये कुतूहल निर्माण करणे हे आधुनिक काळातील शिक्षकाचे कर्तव्य आहे.” असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित ‘माध्यमिक विद्यार्थ्यांची भेट’ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी उपप्राचार्य प्रोफे. डॉ. लतिका बागल, उपप्राचार्य प्रोफे. डॉ. बजरंग शितोळे हे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. दादासाहेब साळुंखे पुढे म्हणाले की, “शालेय विद्यार्थ्यामध्ये विज्ञानाविषयी कुतूहल व आवड निर्माण करण्यासाठी अशी भेट आयोजित करणे गरजेचे असते. विद्यार्थ्यांना ज्ञानसंपादनासाठी प्रश्न पडणे गरजेचे असते. यासाठी विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगी बाळगला पाहिजे”
या उपक्रमात यशवंत विद्यालय पंढरपूर येथील ई. ९ वी मधील एकशे पाच विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सहभाग घेतला. या उपक्रमात बी.एस्सी. भाग तीन च्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या चोवीस प्रकारच्या सायंटिफीक मॉडेलचे प्रात्यक्षिके सादर केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोफे. डॉ. लतिका बागल यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. दिनेश शिंदे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. पांडुरंग घाडगे, प्रा. विजय खूळपे, प्रा. प्रशांत पिसे, प्रयोगशाळा परिचर नितीन नेहतराव, योगेश महीडा व बी.एस्सी. भाग ३ मधील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रा. योगेश पाठक यांनी मानले.
………………………………………………………………………………………………………………………………………………………………………………… संपादक,
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१