विशेषसंपादकीय

रंगात रंगली पंढरी नगरी..!

पंढरीतील यमाई तलाव येते रंगपंचमीचा झाला जल्लोष. यावेळी पंढरपूरकरांसह भाविक आणि शासकीय अधिकाऱ्यांनी लावली आवर्जुन हजेरी.

24 मराठी न्यूज

पंढरीचा परमात्मा पांडुरंग हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो जगाच्या पाठीवर एक महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारे श्रीक्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे रंगपंचमी सणाच्या निमित्ताने देवाला दररोज पांढरा पोशाख करुन देवाच्या अंगावर केशर व गुलाब पाण्याच्या रंगाची उधळण केली जाते. सलग महिनाभर हा दिनक्रम सुरु असते या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, डीवायएसपी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी यांचे हस्ते यमाई तलाव येथे श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करुन रंगपंचमी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला. श्री विठ्ठल मूर्ती पूजनानंतर डीजे च्या तालावर उपस्थित अबालवृद्धांनी ठेका धरला या रंगपंचमी सोहळ्यात पंढरपूरकारासह वारकरी भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात

आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!