24 मराठी न्यूज
बुद्धिबळ खेळातील भारतीय ग्रँडमास्टर म्हणून ओळखला जाणारा आर. प्रग्नानंधाने १६ खेळाडूंच्या चेसबल्स मास्टर्स ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धेच्या पाचव्या फेरीत जागतिक चॅम्पियन ठरलेल्या मॅग्नस कार्लसनचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे. कार्लसनने डावामध्ये त्याच्या ४०व्या चालीवर मोठी चूक केली. या चुकीचा फायदा घेत प्रग्नानंधाने कार्लसनला पराभूत करण्यात यश मिळवले. यापूर्वी फेब्रुवारीमध्ये झालेल्या एयरथिंग्स मास्टर्स ऑनलाईन रॅपिड शतरंज टूर्नामेंटमध्ये कार्लसनला प्रग्नानंधाने पराभूत करत अप्रतिम अशी कामगिरी करून दाखवली होती.चेसबल्स मास्टर्स ही १६ खेळाडूंची ऑनलाईन जलद बुद्धिबळ स्पर्धा आहे. कार्लसन आणि प्रग्नानंधाचा डाव ड्रॉ कडे जात होती. मात्र कार्लसनने त्याच्या 40व्या चालीवर मोठी चूक केली. प्रग्नानंधाने या चुकीचा फायदा घेत कार्लसनला पराभूत केले
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व बातम्या आणि जाहिराती “२४मराठी न्यूज” मध्ये देण्यासाठी संपर्क करा संपादक- श्री लखन साळुंखे पंढरपूर, ९७६४२०२०२१